पुण्यात नव्यानं निर्बंध लादणार?, अजित पवार म्हणाले…

राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला. दरम्यान आता तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात करोना आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नव्यानं निर्बंध लादणार का, यावर स्पष्टीकरण दिले.

अजित पवार म्हणाले, “मास्क वापरणं बंद केला तर खूप मोठ्या प्रमाणावर परिस्थिती बदलत आहे. पुण्यात जिथं जिथं कार्यक्रम, वाढदिवस झाले. तिथं संपूर्ण घरं करोना पॉझिटिव्ह आले आहेत. पुण्यात नव्यानं निर्बंध लादणार नाही, पण पुणेकरांनी निर्बंध लावण्याची वेळ सरकारवर आणू नये. मात्र करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असेल तर आम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागेल.”

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवीन निर्बंध?
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवीन निर्बंध लादणार का?, यावर बोलतांना अजित पवार म्हणाले, “नवीन निर्बंधाबाबत बैठकीच चर्चा झाली. परंतु मोठे मंडळ साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणार असल्याने, नवीन निर्बंध लादणार नाही. पण नागरीकांनी गर्दी केली तर पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याचं दिवशी कठोर भूमिका घेण्यात येईल. त्यामुळे तशा प्रकारची वेळ येवू नये.”

“शाळा सुरू घेण्याचा निर्णय जेव्हा होईल तेव्हापर्यंत सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ग्रामीण भागात रुग्ण संख्या अधिक आहे. पाच तालुक्यात रुग्ण अधिक आहेत. जिल्ह्यात पॉझिटिव्ह रेट ४ टक्के आहे. टेस्टिंग अधिक होत असल्याने रुग्ण ही अधिक आहेत.”, असे देखील अजित पवार म्हणाले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *