नवशिक्या कारचालकाने चिरडले; डोक्याला जबर मार लागल्यामुळे स्मृतिभ्रंश

गडचिरोली : १५ ऑगस्ट रोजी सर्वत्र स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष सुरू असताना संध्याकाळी एका नवशिक्या कारचालक युवकाने एका व्यक्तीला जबर धडक देत वाहनासह चिरडले. यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव देवानंद देवगडे ( वय ४१) असून डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांना स्मृतिभ्रंश झाला आहे.

१५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी देवानंद देवगडे अयोध्यानगर येथे कॉलनीतच कच्च्या रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी आपले वाहन थांबवून मित्राची वाट बघत होते. त्याच वेळेस एक युवक भरधाव वेगाने कार घेऊन आला आणि त्याने देवानंद देवगडे यांना जबर धडक दिली. विशेष म्हणजे धडक दिल्यावरही कार थांबली नाही. देवगडे यांना त्यांच्या वाहनासह चिरडत फरफटत मुख्य रस्त्यापर्यंत केले. देवगडे यांची दुचाकी दुभाजकावर लागल्यानंतर ते कारच्या बॉनेटवर आदळले व खाली पडले. या कारचा वेग इतका होता की ती कार दुभाजक पार करत मारुती सुझुकी अरेनाच्या कार्यालयात घुसली. या अपघातामुळे देवानंद देवगडे यांना जबर मार लागला. त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. या अपघातात देवगडे यांना स्मृतिभ्रंश झाल्याची माहिती त्यांच्या पत्नी तुलना देवगडे यांनी दिली आहे. यासंदर्भात आरोपी कारचालक सौरभ नंदाजी सातपुते या युवकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून, घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलिस करत आहेत.
सदर आरोपी सौरभ सातपुते यांचे वडील नंदाजी सातपुते हे महिला महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. मुलाच्या हातून गुन्हा घडल्यानंतरही त्यांनी फिर्यादी देवगडे परिवाराला मध्यस्थिंकडून अरेरावी केली. असे किती अपघात होतात. मी डोकं फोडलं तर त्यांनीही माझं डोकं फोडावं, अशा शब्दांत ते फिर्यादी देवगडे परिवारासोबत बोलत आहेत. एका प्राध्यापक माणसाला ही अरेरावीची भाषा शोभत नाही. अशी प्रतिक्रिया अपघातात जखमी देवानंद यांच्या पत्नी तुलना देवगडे यांनी दिली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *