समाजातील वंचित घटकाला न्याय मिळाला पाहिजे:-भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर


*बोरगाव (इरई) येथे नागरिकांना विविध शासकीय योजनांबद्दल मार्गदर्शन*

कोरपना तालुक्यातील बोरगाव इरई येथे नागरिकांना शासनाच्या विविध शासकीय योजनांच्या संदर्भात मार्गदर्शन करणयात आले.समाजात जीवन जगत असताना मनुष्याचेसुद्धा समाजाप्रति काही देणं लागत असत,त्यामुळे आपण प्रत्येक गोर-गरीब व्यक्तींची मदत केली पाहिजे, तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सतत प्रयत्नशील असले पाहिजे,व आपल्या राज्यघटनेने सर्वांना समान न्यायाचा अधिकार प्रदान केला आहे,त्यामुळे आपल्या समाजातील प्रत्येक वंचित घटकाला न्याय मिळाला पाहिजे तेव्हाच आपल्यामध्ये आदर्श समाजाची निर्मिती होईल असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी केले.

बोरगाव येथे नागरिकांना संजय गांधी निराधार योजना,रेशन कार्ड,प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, यासाठी लागणारे कागदपत्रे यांची माहिती देण्यात आली.तसेच गावातील नागरिकांच्या समस्यासुद्धा जाणून घेण्यात आल्या.तसेच शेतकऱ्यांच्या शेतात रानटी डुक्कर व रोही यापासून नाहक त्रास होत असून यामुळे शेतातील पिकांची नासाडी होऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.त्याकरिता आपण वनविभागाकडे पाठपुरावा करू असे यावेळी आशिष ताजने यांनी सांगितले.

यावेळी ग्राम पंचायत सदस्य अरुण पाटील नवले,पोलीस पाटील प्रमोद देरकर,माजी उपसरपंच नरेंद्र धाबेकर,माजी ग्रामपंचायत सदस्य गोकुळदास बुच्चे,गजानन चौधरी, पुरुषोत्तम गौरकर, मारोती घोरुडे, अजय अजय लिंगमे, गणेश पाटील चामाटे,विजय देवतळे,सुरज कोल्हेकर व समस्त बोरगाव येथील नागरिक व महिलांची उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *