विदर्भ महाविद्यालय जिवती येथे स्वातंत्र्यदिन व सत्कार समारंभ संपन्न.

भारतीय स्वातंत्र्या च्या 74 वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला श्री व्यंकटेश बहुउद्देशीय संस्था चे कोषाध्यक्ष श्री दीपक महाराज पुरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सदर कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी शेख रहुफ शेख चमन सचिव, मोहन भारती सहसचिव, विश्वनाथ देशमुख, नानासाहेब देशमुख, विठ्ठल महाराज पुरी, रंगनाथ देशमुख सर्व संचालक मंडळ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य यांच्या उपस्थित ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून काही कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यात महाविद्यालयीन कर्मचारी अनिल नळे, व्यंकटी वाकळे प्रा. गजानन राऊत यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्या बद्दल गौरविण्यात आले, तसेच प्रा. श्रीकांत पानघाटे यांनी रातूम नागपूर विद्यापीठाची संत तुकाराम च्या सर्वांगीण कार्य यावर आचार्य पदवी प्राप्त केली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तर जिवती परिसरात नक्षलवादी कार्यवाहीत शहीद झालेल्या स्व. सूर्यभानजी शिंदे यांच्या पत्नी श्रीमती रेणुकाताई शिंदे यांचा सुद्धा शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागा द्वारे वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. देशमुख सर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जाते तर प्रा. तेलंग सर, प्रा. लांडगे सर, मंगाम, वासाडे, मुंडे, साबळे, मस्कले यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *