पैनगंगा पात्रातून अवैध रेती उपसा कोरपना तहसीलदाची परवानगी

By : Shivaji Selokar

कोरपना :- मौजा तामशी रीठ ग्राम इरई येथील पैनगंगा नदीपात्रातुन लिजधारकांनी मोठ्या प्रमाणात रेतीसाठा उत्खनन केला. महेंद्र वाकलेकर, तहसीलदार कोरपना यांच्याशी संगनमत करून अंदाजे ५००० ब्रॉस आत्ता पर्यन्त विकला. अंदाचे तेवढाच ब्रॉस रेतीचा साठा बिनाअकृषक जागेवर सर्वे नं ३ जागा मालक प्रफुल भगत व सर्वे नं ७ जागा मालक विनोद भगत यांचे कृषक जागेवर साठवनुक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हा खनिकर्म अधिकारी चंद्रपुर यांचे भरारी पथकातील अधिकारी खेडकर मैडम यांनी मोक्यावरिल साठयाचा पंचनामा केला त्याचा अहवाल वृत्त लिही पर्यन्त हाती आला नाही .

तहसील कार्यालय कोरपना यांचे कडून तक्ररदार यांना मिळालेल्या महिती अनुसार तहसीलदार वाकलेकर यांनी सर्वे नं ३ व सर्वे नं ७ चे शेत मालक व लिजधारक यांना पत्र क्रमांक ३६/२०२०-२०२१/२५७० व २५७१ प्रमाणे नोटिस देऊन यांना माहे जून २०२१ रोजी खुलासा मागितला होता . तेव्हा सर्वे नं ३ या कृषक जागेवर ८००० चौ.फुट व सर्वे नं ७ या कृषक जागेवर ४००० चौ.फुट रेती साठा एकूण रेती साठा १२००० चौ. फुट साठवनुक केल्याबाबत खुलासा मागितला होता. तेव्हा माननीय तहसीलदार वाकलेकर यांनी लिजधारकावर जप्तीची दंडनीय कार्यवाही केली नाही . या क्षेत्राचे मंडल अधिकारी चव्हाण यांना या रेती घाटावार चाललेल्या बेकायदेशीर उत्खनन ,साठवनुक व विक्री ची माहिती होती परंतु त्यांना वेळोवेळी लक्ष्मीदर्शन होत असल्याने त्यांनी सदर गौण खनिज तस्करी प्रकरनात शासना कोटयावधी रूपयाचा महसूल बुडत असताना सुद्धा डोळेझाक केली आहे तेव्हा मंडल अधिकारी चव्हाण यांची व तहसीलदार वाकलेकर यांची निष्पक्ष चौकशी व्हावी व त्यांना सेवेतुन निलंबित करण्यात यावे अशी मागणी विजय ठाकरे यांनी जिल्हाधिकारी चंद्रपुर व महसूल आयुक्त नागपुर यांच्याकडे केली आहे .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *