पर्यावरणाचे संवर्धन हा पर्यावरणाचा समतोल योग्य ठेवण्याचा पर्याय*

लोकदर्शन     लोकदर्शन 👉मोहन भारती
🔶मैत्री दिनानिमित्ताने अमलनाला धरण परिसरात केले वृक्षारोपण
गडचांदूर,,
मैत्री दिना निमित्त अमलनाला जवळ वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांचे आयोजन वाइल्ड लाइफ इनवारमेंट कॉन्झरवेशन नेचरिंग फौंउडेशन गडचांदुर व वन विभाग ,गडचांदूर च्या वतीने करण्यात आले, यावेळी विविध प्रजातीच्या वृक्षाचे रोपण करण्यात आले , मैत्री दिना निमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण बद्दलची आपुलकी व मैत्री ,वि कॅन फौंडेशन ने दाखवून दिली आहे , सिमेंटचे वाढते बांधकाम त्या मुळे जंगल आणि निसर्गाची झपाटय़ाने होत असलेली हानी व त्यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. औद्योगिकीकरणामुळे , सिमेंट कारखान्यामुळे, वाढत्या प्रदूषणमुळे वृक्ष संवर्धनाची गरज आहे, तर दुसरीकडे परिसरात दररोज येणाऱ्या हजारो वाहनांमधून सोडण्यात येणारा कार्बनडॉक्साइड वायूचाही परिणाम होत आहे.
तापमान रोखण्यासाठी वृक्षलागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी दरवर्षी शक्य होईल तितक्या प्रमाणात वृक्षारोपण करून उन्हाळयात त्यांना पाणी देऊन संगोपन , करण्याचे कार्य वि कॅन फौंडेशनच्या व वन विभागाचे प्रत्यनाने सुरू आहे , वन विभागाच्या सहकार्यने वि कॅन फौंडेशन ने मागच्या वर्षी केलेल्या ,मियावाकी वृक्षारोपणची वृक्ष मोठी झाली असून , सर्व झाडे चांगल्या प्रकारे वाढत आहे , यासाठी संस्थेच्या सदस्यांनी मोठी मेहनत घेतली असून वन विभागाने सहकार्य केले आहे . मैत्री दिना निमित्त वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी वनाधिकारी ,बिंगेवार,राठोड,व वाइल्डलाइफ इनवारमेंट नेचरिंग फौंउडेशनचे
डॉ.प्रवीण लोणगाडगे , सुयोग भोयर, प्रितेष मत्ते, राकेश गोरे,हर्षल ढवळे, सतीश जमदाळे,दीपक खेकारे, वैभव राव , निवास पवार,पवन खंडसिंगे,प्रेम बुऱ्हाण,सागर राळे,गौरव मेश्राम,स्वप्नील आत्राम व संस्थेचे सदस्य उपस्थित होते,

वृक्षरोपण व संवर्धन हा पर्यावरण समतोल सुरक्षित ठेवण्याचा उपाय

दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले
सावलीसाठी सर्वाना मोठी झाडे उपयुक्त ठरतात.परंतु रस्त्यात अडथळा म्हणून अनेकदा वृक्षतोड होते.तेव्हा पर्यावरण संरक्षण संवर्धन व्हावे यासाठी मोठी झाडे टिकवने व नवीन वृक्षारोपण व्हावे व प्रत्येकाने फौंउडेशनच्या सदस्यांनी व्यक्त केले

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *