धानोली तांडा-2 येथे आमदार सुभाष धोटे यांच्या निधीतून समाज मंदिराचे भुमी पूजन                                     

लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर-
कोरपना तालुक्यातील धानोली तांडा – 2 येथे आमदार सुभाष धोटे यांच्या स्थानिक विकास निधीतून 15 लाख रुपये खर्च करून समाज मंदिर उभारण्यात येणार आहे. त्या समाज मंदिर बांधकामाचे भुमीपुजन आमदार सुभाष धोटे यांच्या आदेशाने नुकतेच पार पडले.
या प्रसंगी जि. प. सदस्या सौ कल्पनाताई पेचे, सौ. वीणाताई मालेकर, प.स.कोरपना च्या उपसभापती सौ सिंधुताई आस्वले, माजी सभापती तथा प.स. सदस्य शामभाऊ रणदिवे,माजी उपसभापती तथा प.स.सदस्य संभाजी कोवे,माजी जि.प.सदश्य उत्तम पेचे, कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना चे संचालक भाऊराव चव्हाण,सार्वजनिक बांधकाम गडचांदूर च्या अभियंता सौ रामटेके मॅडम इतर मान्यवर व गावातील नागरिक या प्रसंगी उपस्थित होते.
,

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *