जिवती येथे अतिवृष्टीमुळे आपले सरकार सेवा केंद्र कोसळले 3 लाखाचे नुकसान

By : Mohan Bharti

जिवती : जिवती येथील चंद्रकांत घोडके यांचे आपले सरकार सेवा केंद्र मागील तीन दिवसाच्या संततधार पावसाने कोसळले.  व संपुर्ण फर्निचर, संगणक, प्रिंटर ,दरवाजे, टिनाचे शेड इत्यादि मौल्यवान वस्तू पूर्णपणे पाण्यात वाहून गेल्या असून दुसऱ्या ला सेवा देणाऱ्यावरच निसर्गाचा प्रकोप झाला आहे, तहसीलदार जिवती यांच्या चंमुने घटनास्थळी भेट दिली व मोका पंचनामा केला 3 लाखाचे नुकसान झाल्या चा प्राथमिक अंदाज आहे,तालुक्यातील इतर भागात सुद्धा मोठे नुकसान झाले आहे, त्यांना शासनाने मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *