

लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना – विद्यार्थी संख्येच्या बाबतीत जिल्ह्यात द्वितीय क्रमांकावर असलेल्या महात्मा गांधी व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूरच्या प्राचार्यपदी स्मिता अनिल चिताडे यांची निवड करण्यात आली असून नुकताच १ जुलैला त्यांनी पदभार सांभाळला आहे.
नुकतेच प्राचार्य कृष्णा बत्तुलवार सेवानिवृत्त झाल्यामुळे उपमुख्याध्यापिका स्मिता अनिल चिताडे यांना पदोन्नती देण्यात आली आहे. स्मिता चिताडे या गणित विषयांमध्ये एम.एस्सी. असून अनेक वर्षांपासून महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयात गणित विषयाच्या अध्यापनाचे कार्य करीत आहे.
स्मिता चिताडे यांच्या प्राचार्यपदी नियुक्तीने शाळेच्या विकासाचा आलेख आणखी वेगाने वाढणार असल्याचा विश्वास संस्थाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केला.