अहमदनगर लाचवुचपत विभागाची आळे फाटा येथे मोठी कारवाई, संगमनेर तालुक्यातील श्रेणी 1 दर्जाचा वनखात्याचा अधिकारी जाळ्यात,

लोकदर्शन 👉 मोहन भारती   ===========                       ⭕आळेफाटा येथील विजय कुऱ्हाडे या तक्रारदाराने केली होती तक्रार*
दि 3/7/2021 सायं 7 वा. झाली कारवाई.

संगमनेर तालुक्यातील डोळासने गावातील जमिनीचे निर्वाणीकरण कसे केव्हा झाले असा विषयी जिल्हाधिकारी अ नगर यांनी अहवाल संगमनेर उपविभागिय अधिकारी विशाल बोऱ्हाडे यांचेकडे मागितलेला असताना अहवाल देण्यासाठी अर्जदार विजय रामचंद्र कुऱ्हाडे यांचेकडे 1 लाख रूपयांची मागणी केली होती, सदरचा गंभिर प्रकार आळे गावचे उपसरपंच विजय भिका कुऱ्हाडे यांना समजला व मदत व्हावी म्हणून राज्याचे वनराज्यमंत्री ना दत्तामामा भरणे यांना श्री कुऱ्हाडे यांनी सांगितला व नाशिक दौऱ्यावर असताना नामदार दत्तामामा भरणे यांनी स्विय्य सहाय्यकाद्वारे रेंगाळलेले काम वेळेत पुर्ण करण्याचे व सुस्पष्ट अहवाल देण्याचे आदेश दिलेले असताना ते डावलून विशाल बोऱ्हाडे या वर्ग 1 च्या अधाकाऱ्याने तरीही मागणी कायम ठेवली व आज संगमनेरला बोलवून घेतले व संगमनेर हून मी पुण्याला जाणार आहे व मला आळेफाटा येथे पैसे द्या, असे सांगितले, किमान 40 हजार आता द्या असे सांगीतले , मग मात्र अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचेशी विजय भिका कुऱ्हाडे यांनी संपर्क साधला, व तात्काळ टीम आळेफाटा येथे दाखल झाली, संगमनेर ला जावून सगळी खात्री झाली व आळेफाटा येथे आरोपी आल्यानंतर पैसे स्विकारले, पथकामे सापळा रचून पैसे स्विकारल्या नंतर कारवाई करून तात्काळ पंचनामा करून अरोपी विशाल बोऱ्हाडे याला अटक केली, व संगमनेर येथे नेवून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.

विजय भिका कुऱ्हाडे
उपसरपंच आळे
अध्यक्ष- जुन्नर तालुका रा काँ पक्ष सोशल मिडीया (प्रसिद्धी प्रमुख) 9766081414

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *