ना. विजय वडेटटीवार यांच्या पुढाकाराने* *ब्रम्हपूरी क्षेत्रातील रस्त्यांच्या कामासाठी ११ कोटी रु. प्रशासकीय मान्यतेसह निधी मंजूर

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*पुरामुळे खराब झालेल्या रस्त्यांची आता तातडीने होणार दुरुस्ती*

चंद्रपूर – ब्रम्हपूरी क्षेत्रातील ब्रम्हपूरी, सावली आणि सिंदेवाही तालूक्यातील ग्रामीण भागातील काही रस्त्ये रहदारीस अयोग्य असल्यामुळे हे रस्ते तातडीने दुरुस्त करण्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध होण्यासाठी या क्षेत्राचे आमदार व जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेटटीवार यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागभीड यांना शासनाने कडे सर्वे करुन प्रस्ताव सादर करण्यासाठी सुचना केल्या. शासनानकडे प्रस्ताव प्राप्त होताच त्यांनी केलेल्या नियोजनामुळेच व केलेल्या प्रयत्नामूळेच ब्रम्हपूरी क्षेत्रातील ब्रम्हपूरी, सावली व सिंदेवाही तालुक्यातील विविध विकासकामासाठी रस्ते व पूल नरिरक्षण व दुरुस्ती कार्यक्रम सन २०२१-२२ अंतर्गत रस्ते दुरुस्ती कार्यक्रम या योजनेंतर्गत ११ कोटी २ लक्ष रुपयांच्या कामांना दिंनांक १ जुलै २०२१ च्या आदेशानुसार प्रशासकीय मान्यतेसह निधी उपलब्ध करुन देण्यात आली असल्याने राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेटटीवार यांच्या प्रयत्नामूळे ब्रम्हपूरी क्षेत्रात विकासकामांना गती मिळालेली असल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
राज्याचे मंत्री विजय वडेटटीवार हे ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपूरी, सावली व सिंदेवाही तालूक्यातील सर्व गावांचा दौरा करून गावातील अडिअडचणीबाबत नागरिकांसोबत चर्चा त्यांनी केलेल्या विविध विकासकामा संदर्भात आपल्या डायरीमध्ये नोंद करुन संबधित अधिका-यास शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यास सांगत होते. त्याच अनुशंगाने ग्रामीण भागातील रस्ते रहदारीस अयोग्य झाल्यामुळे हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी संबधित यंञणेला सर्वे करुन प्रस्ताव शासनास सादर करण्यास सांगितले होते. सर्व प्रस्ताव शासनाकडे सादर होताच निधीसह प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन मंजूर होण्यासाठी परिश्रम घेतले. त्‍यांच्या अथक परिश्रमाला यश आले असून नुकतेच रस्ते व पूल नरिरक्षण व दुरुस्ती कार्यक्रम सन २०२१-२२ अंतर्गत रस्ते दुरुस्ती कार्यक्रम या योजनेंतर्गत विकासकांना या योजनेतंर्गत ब्रम्हपूरी तालुक्यातील मेंडकी टेकरी जावराबोडी जुगनाडा बेटाळा सोनेगाव सावलगाव चिखलगाव लाडज रस्ता प्रजिमा ७८ किमी ४/२०० ते ५/५००, ५/६०० ते ६/६०० व ७/५०० ते ८/५०० मध्ये रस्ता, सिडी वर्क व पोचमार्गासह पूरहानीमुळे दुरस्ती करणे १ कोटी रुपये, ब्रम्हपूरी तालुक्यातील रामा ३६८ ते मालडांगरी धामणगाव वायगाव गोवारपेठ राजोली ते पप्रजिमा ३३ किमी ०/०० ते १/०० मध्ये पूरहानीमुळे दुरस्ती करणे १ कोटी ५० लक्ष रुपये, सावली तालुक्यातील बुज सामदा देवटोक ते केरोडा व्याहाड बुज सामदा बुज सोनापूर पेटगाव उपरी रस्ता प्रजिमा-४८ किमी ०/०० ते २६/५०० प्रत्यक्षात किमी २१/५०० ते २२/००, २३/५०० ते २४/००, २४/१०० ते २५/००, २५/०५० ते २६/५० आणी २६/०५० ते २६/५०० मध्ये पूरहानीमुळे दुरस्ती करणे १ कोटी १० लक्ष रुपये, सावली तालुक्यातील रामा ३७५ ते उसरपार चक पालेबारसा सायखेडा गेवरा बुज ईजिमा -६९ ते बारसागड मेहा बुज ते रामा -३७५ ला जोडणारा रस्ता प्रजिमा ११८ किमी ०/०० ते ३/०० मध्ये पूरहानी दुरुस्ती करणे १ कोटी ५० लक्ष रुपये, सावती तालुक्यातील आकापूर करोली विहिरगाव निफंद्रा ते प्रजिमा २९ ला जोडणारा रस्ता प्रजिमा १२० किमी १५/०० ते १५/५०० आणि १५/६०० ते १६/५०० मध्ये पूरहानीमुळे दुरस्ती करणे ६२ लक्ष रुपये, सावली तालुक्यातील बोथली सावली सिर्सी हरंबा उपरी कापसी व्याहाड रस्ता प्रजिमा २८ किमी १०/०० ते ११/०० मध्ये पूरहानीमुळे दुरस्ती करणे ९० लक्ष रुपये, सावली तालुक्यातील बोथली सावली सिर्सी हरंबा उपरी कापसी व्याहाड रस्ता प्रजिमा २८ किमी १७/०० ते १८/०० मध्ये पूरहानीमुळे दुरस्ती करणे १ कोटी रुपये, सावली तालुक्यातील बोथली सावली सिर्सी हरंबा उपरी कापसी व्याहाड रस्ता प्रजिमा २८ किमी २०/०० ते २१/०० मध्ये पूरहानीमुळे दुरस्ती करणे ९० लक्ष रुपये, सिंदेवाही तालुक्यातील पेटगाव राजोली तांबेगडी मेंढा रस्ता प्रजिमा २६ किमी ११/७०० ते १२/५००, १२/६०० ते १३/४००, १३/५०० ते १४/४००, १४/५०० ते १५/५०० आणि १५/६०० ते १६/९०० मध्ये पूरहानीमुळे दुरस्ती करणे १ कोटी ३० लक्ष रुपये अशा प्रकारे ११ कोटी २ लक्ष रुपये निधी मंजूर करुन या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.
विजय वडेटटीवार प्रतिनिधीसोबत बोलतांना म्हटले की, या क्षेत्राचा आमदार म्हणून या क्षेत्रातील अविकास असलेल्या भागाचा विकास करणे हे उदेश ठेवून काम सुरु केले त्यात मोठया प्रमाणात यश आले. गेल्या साडे सहा वर्षापासून या भागात करोडो रुपयांची विकासकामे मंजूर करुन चौफेर विकास करण्यात येत आहे मात्र गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुभावामूळे विकासकामांना सुरुवात करता आले नाही. गेल्या वर्षीपासून तर आतापर्यत मंजूर करण्यात आलेले सर्व विकासकामे येत्या काही दिवसात सुरु होणार असून या क्षेत्राच्या सर्वांगिन विकासासाठी कठीबध्द आहे असे त्यांनी म्हटले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *