सिमेंट सिटी गडचांदूरच्या तालुका निर्मिती साठी विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशनात पाठपुरावा करन्याची , मागणी

,
गडचांदूर,
राजुरा विधानसभा क्षेत्रातील तीनही तालुक्याचे केंद्रGBGBबिंदू व मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गडचांदूर शहराला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा या साठी शासन दरबारी प्रस्ताव प्रलंबित असून पालकमंत्री नामदार विजयभाऊ वडेटीवार यांनी लक्ष देऊन या पावसाळी अधिवेशनात पाठपुरावा करावा व परिसरातील 52गावच्या नागरिकांची रास्त मागणी पूर्ण करावी अशी मागणी गडचांदूर तालुका संघर्ष समिती चे मुख्य संघटक उद्धव पुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे,
अमलनाला पर्यटन केंद्र च्या भूमिपूजन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात हे निवेदन देण्यात आले। या वेळी चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार बाळूभाऊ धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुलहाने, राजुरा विधानसभा क्षेत्रांचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांनाही निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली,या प्रसंगी गडचांदूर नगरपरिषद च्या अध्यक्ष सविताताई टेकाम, मुख्याधिकारी डॉ,विशाखा शेळकी, राजुरा नगर परिषद चे अध्यक्ष अरुनभाऊ धोटे , सर्व नगरसेवक, वन,सिंचाई व पर्यटन विभागाचे अधिकारी तसेच परिसरातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते, मागील अनेक वर्षांपासून या मागणीसाठी विविध आंदोलन करण्यात आल्यानंतर शासनाकडे मा जिल्हाधिकारी यांनी रीतसर प्रस्ताव तयार करून तालुका निर्मितीसाठी शिफारस केली आहे, परंतु शासन दरबारी हा प्रश्न निकाली लागलेला नाही त्यासाठी संघर्ष समिती ने पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत गडचांदूर तालुका झाल्यास परिसरातील जनतेला खूप मोठा दिलासा मिळणार आहे,
,

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *