बल्लारपूर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी 10 कोटी रू निधी मंजूर

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासकामांच्या दीर्घ मालिकेत आणखी एक महत्त्वाचे विकासकाम सामील*

विविध विकासकामांच्या माध्यमातून देखणे रूप धारण केलेल्या बल्लारपूर शहरातील नगर परिषदेची इमारत देखील आता नव्या आकर्षक व देखण्या रुपात बल्लारपूरकर जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी 10 कोटी रू निधी मंजूर करण्यात आला आहे .

नगर विकास विभागाच्या दि. 16 जून 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार बल्लारपूर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी 10 कोटी रू निधी मंजूर करण्यात आला आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर शहराने विकासाचे विविध टप्पे अनुभवले आहे. 1999 मध्ये बल्लारपूर तालुक्याच्या निर्मितीनंतर या शहराच्या विकासाला त्यांनी मोठी गती दिली.अर्थमंत्री पदाच्‍या काळात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तर बल्‍लारपूर शहराचा चेहरामोहराच बदलला. विकासकामांची मोठी मालीकाच या शहरात तयार केली. उपविभागीय अधिकारी कार्यालयाची निर्मीती, तहसिल कार्यालय इमारतीचे बांधकाम, पंचायत समिती इमारतीचे बांधकाम, विश्रामगृहाचे बांधकाम, डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र, सुसज्‍ज नाटयगृह, विमानतळासारखे सुंदर बस स्‍थानक, राजवैभवी प्रवेशद्वाराची निर्मीती, स्‍मार्ट पोलिस स्‍टेशन, छठपूजा घाट, मुख्‍य मार्गांचे सिमेंटीकरण, श्‍यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाची निर्मीती, अत्‍याधुनिक भाजी मार्केट, ई-वाचनालये, चार बालोद्याने अशी विविध विकासकामे त्‍यांनी पूर्णत्‍वास आणली. शहरानजिक देशातील अत्‍याधुनिक अशी सैनिक शाळा साकारली असून सर्व आवश्‍यक क्रिडा सुविधांनी परिपूर्ण असे तालुका क्रिडा संकुल देखील पूर्णत्‍वास आले आहे. विकासकामांच्‍या या दिर्घ मालिकेच्‍या माध्‍यमातुन बल्‍लारपूर शहर बदलत गेले आहे. बल्लारपूर येथील रेल्वे स्थानक रेल्वे विभागाच्या देशव्यापी स्पर्धेत राज्यात अव्वल ठरले.आता नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी 10 कोटी रू निधी मंजूर झाल्याने एक नवे विकासकाम या विकासकामांच्या मालिकेत जोडले गेले आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पक विकास शैलीतून पोम्भूरणा येथील नगर पंचायतीची प्रशासकीय इमारत व्हाईट हाऊस सारखी देखण्या स्वरूपात उभी राहिली असल्याने आता बल्लारपूर नगर परिषदेची प्रशासकीय इमारत किती आकर्षक स्वरूपात उभी राहणार याची उत्सुकता आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *