

लोकदर्शन 👉 मोहन भारती
१. ५ ० कोटी रुपये निधीतून होणार रस्त्याचे नूतनीकरण व डांबरीकरण.
कोरपणा :– आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते कोरपना तालुक्यात ग्रामीण भागात विकासकामांना गती देण्याच्या उद्देशाने रस्ते विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात हिरापूर – पालगाव रस्त्याचे नूतनिकरण व डांबरीकरण करणे – १.५० कोटी रुपये, पालगाव येथे अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे – १० लक्ष रुपये आदी कामांचा समावेश आहे. या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कायम प्रयत्नरत राहू अशी ग्वाही दिली तर ग्रामस्थांनी त्यांचे विशेष स्वागत करुन गावात रस्ते विकासासाठी प्राधान्य दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
या प्रसंगी हिरापूर – पालगाव येथे सरपंच सुनीता तुमराम, उपसरपंच अरुण काळे, उपसभापती सिंधुताई आस्वले, जी.प. सदस्य सौ वीणाताई मालेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव थिपे, माजी सरपंच उद्धव बल्की, वंदनाताई बल्की, माजी सरपंच मुर्लीधर बल्की, वैशालीताई पावडे, माजी सरपंच अरुण वाघमारे, सुरेश पाटील मालेकर , सुभाष ताजने, पाचभाई यासह स्थानिक नागरिक उपस्थीत होते.