आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांनी बरांज मोकासा येथील कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमी. या कंपनीच्‍या प्रकल्‍पग्रस्‍त शेतकरी व कामगार यांचे प्रश्‍न मार्गी.

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
गेल्‍या अनेक वर्षांपासून बरांज मोकासा येथील कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमी. ही कंपनी कोळसा उत्‍खननाचे कार्य करीत आहे. या प्रकल्‍पासाठी बरांज मोकासा व चेक बरांज या गावातील अनेकांची जमीन संपादीत करण्‍यात आली आहे, परंतु आज अनेक वर्षांनंतर सुध्‍दा या प्रकल्‍पग्रस्‍तांना व खाणीत काम करणा-या कामगारांना त्‍यांचे हक्‍क मिळाले नाही. त्‍यासंदर्भात आज लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्‍हाधिकारी यांचेसोबत विस्‍तृत बैठक घेतली. या बैठकीला भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा तालुका महामंत्री नरेंद्र जिवतोडे, पं.स. सभापती प्रविण ठेंगणे, जि.प. सदस्‍य यशवंत वाघ, सरपंच सौ. मनिषा ठेंगणे, उपसरपंच रमेश भुक्‍या, संजय ढाकणे, लक्ष्‍मण भुक्‍या यांची उपस्थिती होती.

 

यावेळी अनेक मुद्दयांवर मा. जिल्‍हाधिका-यांसोबत चर्चा झाली. आ. मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिका-यांना या प्रकल्‍पग्रस्‍तांचे व कामगारांचे प्रश्‍न तातडीने सोडविण्‍यास सांगीतले. अॅग्रीमेंट नुसार वेतन, नियुक्ती पत्र, पुनर्वसन, गावाच्‍या पोच मार्गावरून होणारी जड वाहतुक, प्रकल्‍पाच्‍या उरलेल्‍या ७० हेक्‍टर जमीनीवर संपादीत करून वृक्षारोपण करणे, ग्राम पंचायतचे मागील सात वर्षाचे अंदाजे रू.३५ लाख टॅक्‍सच्‍या रूपात वसुल करणे या विषयांवर आ. मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिकारी चंद्रपूर यांना ताबडतोब निर्णय घेण्‍याचे निर्देश दिले. यावर मा. जिल्‍हाधिकारी यांनी हे सर्व मुद्दे लवकरात लवकर निकाली काढण्‍याचे आश्‍वासन दिले. अनेक दिवसांपासून प्रलंबित असणा-या प्रकल्‍पग्रस्‍त शेतकरी व कामगार यांनी
त्यांचे प्रश्‍न त्‍वरीत सोडविल्‍याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले व आभार मानले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *