!! गडचांदुर शहर भाजपा च्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करून न .प .गडचांदूर आरोग्य विभागातील कोरोना योद्धा कर्मचारी यांचा भेट वस्तु देवुन सत्कार !!

By : Shiavji Selokar

गडचांदुर-मागील दिड वर्षापासुन कोरोनाने अक्षरशः थैमान घातले.कोरोना रुग्णाजवळ.जाने संसर्ग होऊन बाधित होण्याचा धोका असल्याने सग्गे नातलग सुध्दा जवळ जाण्यास घाबरत होते.अशा परीस्थित गडचांदुर शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आज पर्यंत 12 कोरोना रुग्णाचे मृत्यू झाले.व त्यांचा अंत्यसंस्कार नगर परीषद आरोग्य विभागा तर्फे करण्यात आले .सदर अंत्यविधी करतांना त्यांनी आपल्या जिवाची कुठलीही पर्वा न करता त्या कोरोना बाधित होऊन मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे अंत्यसंस्कार करणारे प्रकाश झोतात न येणारे यांचाही कुठेतरी सत्कार होणे आवश्यक असल्याने न .प .गडचांदूरचे आरोग्य विभाग प्रमुख श्रि स्वप्निल पिदुरकर,श्री श्री प्रमोद वाघमारे श्री नार्वेकर यांचा आज गडचांदुर शहर भाजपा च्या वतीने देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदि यांच्या सात वर्षाचा यशस्वी कार्यकाळ पुर्ण झाल्याचे औचित्य साधुन
यांना शाल श्रीफळ व टिफीन बॉक्स पाण्याची बाँटल व फळयुक्त गुलदस्ता देवुन सत्कार करण्यात आला.यावेळी गडचांदुर शहर अधक्ष सतीश उपलेंचवार भाजपा नेते निलेश ताजने,नगरसेवक अरविंद डोहे,रामसेवक मोरे,गडचांदूर तालुका संघर्ष समितेचे सचिव उद्धव पुरी अजीम बेग आदि उपस्थित होते

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *