

लोकदर्शन ÷ मोहन भारती :– आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथील आशाधाम रुग्णालयास भेट देऊन येथील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. येथे आॅक्सिजन बेडची निर्मिती करून स्थानिक परिसरातील गोरगरीब कोरोना रुग्णांना दिलासा मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू, आजच्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीत आशाधाम सारखे रुग्णालय मदत करण्यास तयार आहे. येथे परिसरातील कोरोना रुग्णांसाठी एक निस्वार्थ आधार प्राप्त होत आहे. येथील एकूण परिस्थिती लक्षात घेता या ठिकाणी प्राणवायू युक्त खाटांची निर्मिती करण्यात यावी अशा सुचना संबंधित अधिकाऱ्यांना आमदार सुभाष धोटे यांनी दिल्या.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार हरीष गाडे, सरपंच भाग्यश्री आत्राम, अजय रेड्डी, बोंडे गुरुजी, सोनू सिंग, इरफान सय्यद, राकेश रामटेके, मंगेश पावडे, ज्ञानेश्वर गोरे, प्रवीण चिडे, विलास आक्केवार , पवार गुरुजी, नामदेव चिडे, अजित सिंग, बाबुराव फटाले, कवडू दोरखंडे, संगेश पावडे मोतीराम डोब्बलवार यासह आशाधाम रुग्णालयाचे पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.