कोरपना जिवती तालुक्यातील औद्योगिक शहर गडचांदूर जनसंख्या ने मोठे आहे की ,कोरपना ??

लोकदर्शन प्रतिनिधि 👉 रंगनाथ देशंमुख
⭕दि 9 /5/2021 ÷गडचांदूर सोबत परकेपणाचा व्यवहार केल्याचे कारण समजत नाही !!
कोरपणा इथे पाच तर गडचांदूर ला दोनच ऑक्सिजन कान्सस्टेटर

सन्माननीय साहेबांचा आरोग्य व्यवस्थेविषयी आढावा दौरा करत असताना गडचांदूर च्या स्वीकृत नगरसेवकांना प्रसिद्धी प्रमुख यांनी सरळ नगरसेवक उल्लेख करून काय साध्य केले समजावे

गडचांदूर हे शहर पूर्वीपासून कोरपना आवारपूर भोयगाव जिवती या संपूर्ण एरियाच्या मध्यस्थानी एक औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय याचा दर्जा द्या अशी मागणी अनेक वर्षांपासून अनेक संघटनांनी केली तरी सुद्धा गडचांदूर ला अजून पर्यंत उपजिल्हा रुग्णालय दर्जा देण्यात आला नाही ,जर करता गडचांदूर ला उपजिल्हा रुग्णालय असते तर या ठिकाणी ऑक्सिजन सह वैद्यकीय सेवा गडचांदूर जवळील प्रत्येक गावाला मिळाली असती अनेक दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजुरा विधानसभा अध्यक्ष महालिंग कंठाळे या विषयावर रुग्णांची सेवा होण्यासाठी या व अनेक समस्या वर प्रशासनाच्या व स्थानिक नेत्यांच्या निदर्शनात आणून देत असून सुद्धा कळत नकळत असो की हेतुपुरस्पर पण गडचांदूर कडे दुर्लक्ष केले जात आहे हे मात्र निदर्शनात येत आहे .

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *