अंगणवाडी सेविकेकडून लाच घेताना बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला अटक

By : Shankar Tadas
आपल्या देशाला भ्रष्टाचाराचा जणू कॅन्सरच झाला आहे. हेच बघा ना, अगदी अल्प मानधनात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकेच्या पदावर कायम करण्यासाठी तब्बल 15 हजार रुपयाची लाच स्वीकारताना ठाणे जिल्ह्यातील पालघरच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार महिला कल्पना हरी गवळी ही अंगणवाडी सेविका आहे. तिला पदावर कायम करण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी अशोक गोरक्ष खोसे याने तिच्याकडून 21 हजार रुपयाची लाच मागितली. त्यापैकी 15 हजार रुपये 27 एप्रिल रोजी तिच्याकडून स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.
सापळा पथक :
नवनाथ जगताप, पोलिस उपअधीक्षक, भारत साळुंखे, पोलीस निरीक्षक, पोह/कदम, मपोह/मांजरेकर, मपोना/जाधव, पोना/चव्हाण,पोना/सुवारे, पोना/सुतार, पोना/ सुमडा, पोशि/उमतोल एसीबी पालघर युनिट.
मार्गदर्शन अधिकारी
मा.श्री.पंजाबराव उगले, पोलिस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र*
मा.श्री.मुकुंद हातोटे,अपर पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र

आलोसे यांचे सक्षम अधिकारी- प्रधान सचिव,महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य
—————————————-

पालघर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
————+++++++++———-
अँन्टी करप्शन ब्युरो,ठाणे, कॅम्प पालघर
दुरध्वनी 02525-297297
पोलिस उप अधीक्षक नवनाथ जगताप
मोबा 9923346810/ 9923699430
*@ टोल फ्रि क्रं. 1064

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *