कोविड रुग्णांना इंजिनियर आमिरखान यांनी दान केले 1 हजार लिटर ऑक्सिजन,, ,,स्तुत्य उपक्रम,,

By Mohan Bharti लोकदर्शन 

गडचांदूर :  सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोविड रुग्ण संख्येत वाढ झाली आहेत, बहुतेक रुग्णालयात ऑक्सिजन नसल्याने रुग्णांना प्राण गमवावे लागले, अशा कठीण प्रसंगी मानवतेच्या दृष्टीने येथील कोरपना तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष नासिर खान यांचे चिरंजीव युवा इंजिनिअर आमीर खान यांनी 1 हजार लिटर ऑक्सिजन गरजू रुग्णांना दान केले आहेत, या स्तुत्य उपक्रमा बद्दल मिलाप संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयुख चौधरी यांनी आमीर खान चे आभार मानले आहे.आमीर खान यांनी मागील वर्षी सुद्धा लाकडाऊन दरम्यान शहरातील गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू चे वाटप केले होते.युवा इंजिनिअर आमिर खान यांच्या या प्रेरणा दायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहेत.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *