शिवरायांच्या विश्रामगडावरील ‘जीवन’

**शिवरायांच्या विश्रामगडावरील
‘जीवन’
तीनशे वर्षाँनंतरही अनमोल**
By shankar tadas
पट्टेवाडीच्या आदिवासीँना शिवाजी महाराजांच्या पाणी व्यवस्थापनेचा आधार
नाशिक सिन्नर
तालुका पाणीटंचाईचा सामना करत
असताना पट्टेवाडिच्या ५००
लोकवस्तीला आजही शिवकालीन
पाणी व्यवस्थापनेचा आधार मिळत आहे.
सिन्नर-अकोले
तालुक्याच्या सरहद्दीवरील
विश्रामगडावर पाण्याने भरलेले २२ तळे
शिवराची तहान भागवत आहेत.
त्यामुळे
छत्रपती शिवजी महाराजांच्या पाणी व्यवस्थापनेचा आदर्श
तीनशे वर्षानंतरही मार्गदर्शक ठरत आहे.
गडावर असलेल्या ४७ तलावांत कमी-जास्त
प्रमाणात आजही पावसाचे पाणी साठून
राहते.
परीसरातील तिरडे,पेढेवाडी,
ठाणगाव,औँढेवाडी या भागातील
पाण्याचे
साठे उन्हाळ्यात कोरडे पडल्यास
वन्यप्राण्यांना किल्यावरील
पाण्याचाच
एकमेव आधार असतो.
एकीकडे पुरातन
बारव,विहिरी कोरड्याठाक
पडल्या आहेत,तर
धरणांनी तळ गाठण्यास सुरवात
केली आहे.
तथापि,टंचाई च्या भीषण
परिस्थितीत ३००
वर्षानंतरही शिवजी महाराजांच्या दूरदृष्टीतून
निर्माण झालेले तळे तारक ठरले आहेत.

*भूमिगत तळ्याचे वैशिष्ट*
भुमिगत तळ्याची निर्मिती खडकात
कोरीव
पध्दतीने करण्यात आल्याने त्यात पावसाचे
पाणी थेट पडत नाही.
जमिनीवरुन
पाणी तळ्यात
साठले जाईल अशी व्यवस्था आहे.
पाणी झिरपुण
साठून
राहण्याची क्रिया उन्हाळ्यातही अल्प
प्रमाणात सुरु राहत असल्याने
पाणीसाठा टिकून राहण्यास मदत
होते.
गारवा टिकून राहिल्याने
थंडगार,स्वच्छ
पाणी पिण्यास मिळते.
पाण्याचे
बाष्पीभवन
होण्याचा प्रश्नही उद्भवत नाही.
पाण्याचा थेँबन् थेँब पिण्यासाठी वापरात
येईल,अशी व्यवस्था आहे.
किल्ल्यावरील तळे-४७
भुमिगत तळे-२२
वर्षभर पाणी टिकणारे तळे-२२
किल्ल्यावर किमान पाणीसाठी-२
कोटी लिटर
*******
अमोल साठे पाटील यांची फेसबुक पोस्ट

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *