शेतकऱ्यांनी शेतीत सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर केला तरच शेतीची उत्पादकता वाढेल

👉दि 28/3/2021 मोहन भारती

मित्रानो आपण शेतकरी वर्षानु वर्ष शेती करीत आहोत, पारंपरिक शेती करत असताना अनेक समस्यांचा सामना करतो. शेतीतून आपल्याला उत्पन्न मिळते ते आपल्या शेतीत असलेल्या सेंद्रिय कर्ब आणि जिवाणूंमुळे ,जितकी जिवाणूंची संख्या जास्त तितके उत्पन्न जास्त, जिवाणू जास्त असले तर त्यांना लागणारे खाद्य सेंद्रिय कर्ब हि जमिनीत जास्त असले पाहिजे, कारण सेंद्रिय कर्ब हेच या जिवाणूंचे खाद्य असते, म्हणून आपण जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवला तर जिवाणूंची संख्याही वाढेल, पण आपण सेंद्रिय खता ऐवजी रासायनिक खतांचा जास्त वापर करतो.

भारतात हरित क्रांतीला (1967) सुरुवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर वाढला, उत्पनातही 25/30 % वाढ मिळाली पण सातत्याने रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे ज्या जिवाणूंमुळे आपल्याला उत्पन्न मिळते त्या जिवाणूंची संख्या आपण 5/10% वर आणून ठेवली ,आणि म्हणूनच गेल्या 8/10 वर्ष पासून आपल्या उत्पनात सातत्याने घट होत आहे.

आपल्या शेतीची उत्पादकता वाढवायची असेल तर सेंद्रिय पदार्थांचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही, सेंद्रिय पदार्थ मोठ्या प्रमाणात वापरलेही व आपल्या जमिनीत जिवाणू नसतील तर उत्पन्न कसे येईल? रासायनिक खतांमुळे आपण जी जिवाणूंची संख्या नगण्य करून टाकली आहे, ती वाढवण्यासाठी जमिनीत जिवाणू सोडावेच लागतील, तरच आपल्या शेत जमिनीची उत्पादकता वाढेल .

जिवाणूंची शेतजमिनीतील संख्या वाढवण्यासाठी *ऍझो, रायझो , पीएसबी, वेस्ट कंपोझर, ई.एम., जीवामृत, जीवामृत स्लरी , घण जीवामृत , केएमबी, ट्रायकोडर्मा, स्युडोमोनास, मायकोरायझा* यांचा वापर करा,हमखास उत्पन्न वाढ होईल. या व्यतिरिक्त *बॅसीलस सबटीलस,बॅसीलस थ्यूरेंजेसीस, बिव्हेरिया ब्यासियाना, व्हर्टिसीलीयम लेक्यानी, मेट्यारायझीयम अनिसपोली या रसशोषक किडी, हुमणी, डाऊनी, करपा, अळी, मावा, तुडतुडे, मिलिबग इ. किडींसाठी वापरली जाणारी फायद्याचे जैविक मायक्रो ऑरग्यानिझमस् आहेत.
कुठलेही मायक्रो ऑरग्यानिझम घरी नेले की त्याचे मल्टीप्लिकेशन करता येते.

मित्रानो आपल्या शेतजमिनीची उत्पादकता वाढवायची असेल तर रासायनिक खते वापरण्याचे प्रमाण निम्मेवर आणा,म्हणजे 50%च वापरा आणि 30 ते 35% सेंद्रिय खते आणि 15 ते 20%% जैविक खतांचा वापर करा.

*रासायनिक आणि सेंद्रिय खताचा एकत्र वापर केला तर चालते, सेंद्रिय आणि जैविक खतांचाही वापर एकत्र केला तरी चालते, परंतु रासायनिक आणि जैविक खते एकत्र वापरली तर जैविक खते न्यूटरल होतात, रासायनिक आणि जैविक खते वापरताना कमीत कमी 6 ते 7 दिवसांचा गॅप असावा लागतो, तरच जैविक खतांचा चांगला परिणाम होतो*.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *