

वणी, दि 26 / 3 / 2021 शंकर तडस
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खरबडा,ता,झरी जामनी जिल्हा, यवतमाळ येथील कर्तव्यदक्ष शिक्षक शंकर शिवना पत्तीवार यांना जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्काराने 18 मार्च ला यवतमाळ येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा ताई पवार व शिक्षण सभापती श्रीधर मोहोड यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले,याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य चितांगराव कदम,स्वाती येडे,रेणूताई शिंदे,शिक्षणाधिकारी प्रमोद सुर्यवंशी,मधुकर कठोळे, डॉ सतपाल सोवळे उपस्थित होते,
शंकर पत्तीवार हे गेल्या 3 वर्षांपासून खरबडा येथे कार्यरत आहेत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबीवले,कृतिशील शिक्षक म्हणून ओळखले जातात,
शंकर पत्तीवार यांनी 10 वर्षे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुब्बई येथे कार्य केले आहेत,
आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल शंकर पत्तीवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहेत,
गडचांदूर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, येथे एम,सी,व्ही, सी,विभागात कार्यरत असलेले प्रा, भूमन्ना पत्तीवार यांचे ते भाऊ आहेत,