वीर बाबुराव शेडमाकेंचा संघर्ष समाजासाठी प्रेरणादायी – आ. सुभाष धोटे

दि 15 / 3 / 2021 मोहन भारती
*सावलहिरा येथे वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे अनावरणfbc

कोरपना – विर बाबुराव शेडमाके यांनी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इंग्रजांविरुद्ध अठराव्या शतकात कठोर संघर्ष केला. त्यांचा संघर्ष समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.तालुक्यातील सावलहिरा येथे वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे अनावरण, सार्वजनिक वाचनालय आणि डिजिटल क्लासरुमचे लोकार्पण आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की, वीर बाबुराव शेडमाके आपल्या जिल्हातील सुपुत्र असल्याने आम्हाला अभिमान आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांनी ब्रिटिशांच्या गुलामगरीतून मुक्तीसाठी केलेला संघर्ष सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या प्रेरणेने युवा पिढीने आपले आयुष्य उज्ज्वल करावे असे आवाहन केले. क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण तत्पर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधर गोडे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे, पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजी कोवे, जि. प. सदस्या कल्पना पेचे, विनाताई मालेकार, उपसभापती सिंधुताई आस्वले, माजी सभापती शाम रणदिवे, माजी जि. प. सदस्य उत्तम पेचे, सरपंच वनमाला कोवे, सुरेश मालेकर, रोशन आस्वले, गणेश गोडे, दिनकर मुसळे, दामोदर मालेकर,भारत तोडासे, मेहबान राठोड मुख्याध्यापक कैलास मस्की, सोमलाल कोहचाडे, तुळशीराम टेकाम, मोतीराम यासह गावकरी मंडळी उपस्थित होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *