!! माणिकगड सिमेंट कम्पनी कडून होत असलेले डस्ट प्रदूषण 15 दिवसात बंद करा अन्यथा आंदोलन करू भाजप नगरसेवकांनी दिला इशारा!!

शंकर तडस
गडचांदूर –-चंद्रपूर जिल्हातील कोरपना तालुक्यातील कुठल्या ना कुठल्या वादात नावाजलेली सिमेंट कम्पनी म्हणजे माणिकगड सिमेंट गडचांदूर ही असून ज्या शहरात सदरची कम्पनी उभी करून कोट्यवधी रूपये कमवितात व त्याचा शहरातील नागरिकांना डस्ट सोडून नागरिकांचे जीव धोक्यात आणले आहे.अश्या या मुजोर कँपणीने मागील एक वर्षा पासून डस्ट चा वर्षाव करून अक्षरशः साईशांती नगरवासीना जगणे कठीण केले आहे.
कित्येकदा सदर कम्पनी विरुद्ध प्रदूषण विभागाकडे तक्रार करून लक्ष दिले जात नाही.नगर परिषदला मागील दीड महिन्यांपूर्वी डस्ट प्रदूषण बाबत ठराव घेण्याची मागणी करून त्याकडे नगराधक्ष्य तथा सत्ताधारी ठराव घेत नाही.कँपणीच्या व्यवस्थापकास डस्ट प्रदूषण बंद करण्याची मागणी केली असता कम्पणीचे व्यवस्थापक काबराजी डस्ट कँपणीचा नसल्याचे बोलून झटकतात तेव्हा भजपाचे नगरसेवक अरविंद डोहे यांनी कालनीत मिटिंग घेऊन नागरिकांचे मत जाणून घेतले तेव्हा तेथील जनतेनी आम्ही पाठीशी आहो आपण लढा द्या अशी हिम्मत नगरसेवक डोहे यांना देताच त्यांनी पाऊल उचलले व कँपणीच्या व्यवस्थपकाच्या व्हाटसअप वर आपआपले घरचे डस्ट चे फोटो पाठविण्याचा,वयक्तिक फोन करून विचारणे,पीएम केअरला,सीएम केअरला ऑनलाइन तक्रार करण्याचा तसेच अध्यक्ष,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ मुंबई,सहसंचलक सचिव तांत्रिक,महाराष्ट्र प्रदूषण मंडळ मुंबई,सहसंचालक हवा तांत्रक,महाराष्ट्र प्रदूषण मंडळ मुंबई,यांचे कडे तक्रार केली असून प्रतिलिपी
मा. प्रकाशजी जावडेकर ,केंद्रीय पर्यावरण मंत्री भारत सरकार दिल्ली मा. आदित्यजी ठाकरे महाराष्ट्र राज्य पर्यावरण मंत्री मुंबई,मा.विजयभाऊ वड्डेटिवार चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री तथा,मा.सुधीरभाऊ मुंनगंटीवार माजी वित्त नियोजन मंत्री तथा बल्लारपूर आमदार ,मा. सुभाषभाऊ धोटे राजुरा आमदार,प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियोजन मंडळ चंद्रपूर,व्यवस्थापक माणिकगड सिमेंट कम्पनी यांना मेल द्वारे,तर तहसीलदार कोरपना यांचे मार्फत सर्वाना प्रति GPS द्वारे फोटो सह निवेदन देण्यात आले आहे.यावर काय 15 दिवसात कार्यवाई होऊन डस्ट प्रदूषण बंद न झाल्यास कँपणीच्या गेट समोर रस्ता रोखुन वाहतूक बंद करण्याचा इशारा प्रादेशिक, प्रदूषण नियंत्रण मंडळ विभाग चंद्रपूर,मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर,मा पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना दि 12/3/2021 ला निवेदन द्वारे देण्यात आले आहे.यावर काय कार्यवाई होतील याकडे सर नगरवासींचे लक्ष लागले आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *