महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील एम,सी,व्ही, सी, उत्तीर्ण विध्यार्थी

 

 

दी. 11/03/2021 मोहन भारती
अमर काकडे ची स्पर्धा परीक्षेमधून कॉन्स्टेबल पदी निवड,,
,,,गडचांदूर : महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथील एम,सी,व्ही, सी,विभागातील मार्केटिंग व रिटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम मधून 2016 मध्ये उत्तीर्ण झालेला विद्यार्थी अमर शंकरराव काकडे याने स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे आयोजित स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण करून सी,आर,पी,एफ, पुणे येथे कॉन्स्टेबल पदी निवड झाली आहेत, तो या नवीन पदावर 16 मार्च ला रूजू होत आहेत,
पितृछत्र हरपलेल्या अमर ने अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही कठोर परिश्रम घेतले, जिद्दीने अभ्यास करून सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्या व घवघवीत यश मिळवले,
अमर ने मुक्त विद्यापीठ मधून बी, ए, पदवी संपादन केली असून 2019 मध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे आयोजित करण्यात आलेली स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली,त्या नंतर 2020 मध्ये शारीरिक चाचण्या व मुलाखत उत्तीर्ण झाल्या नंतर त्या ची प्रथम नियुक्ती तळेगाव, पुणे येथील सी,आर,पी,एफ, कार्यालयात कॉन्स्टेबल,( जनरल ड्युटी )या पदावर झाली आहेत,
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे एम,सी,व्ही, सी,विभागात अमर चे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी उपप्राचार्य विजय आकनूरवार,विभाग प्रमुख प्रा, अशोक डोईफोडे, प्रा, आरजू आगलावे,प्रा, माधुरी पेटकर,प्रा, रोशन मेश्राम उपस्थित होते,
अमर काकडे चा मोठा भाऊ गरीब काकडे याने सुद्धा एम,सी,व्ही, सी,अभ्यासक्रम उत्तीर्ण केला असून भाजीपाला विक्री व्यवसाय यशस्वी रीतीने करीत आई श्रीमती वेणू काकडे ला मदत करीत आहेत,
त्या ची बहीण पल्लवी ही सुद्धा नागपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहेत,
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या 32 वर्षांपासून व्यवसाय अभ्यासक्रम सुरू असून अनेक विद्यार्थी रोजगार व स्वयंरोजगार करीत आहेत,
अमर काकडे,याची स्पर्धा परीक्षा मधून निवड झाल्याबद्दल त्या चे सर्व स्तरातून कौतुक होत आहेत,

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *