मालेगाव येथे रविदास जयंती उत्साहात साजरी

by : Ajay Gayakwad

मालेगाव/ वाशिम
मालेगाव येथे  गुरू रविदास जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक वसंतराव भानुसे तर प्रमुख म्हणून मार्गदर्शक म्हणून आदर्श शिक्षक गजानन गायकवाड, नामदेवराव सदार, इंजिनिअर विजय धुमाळे, उत्तमराव शिरभाऊ,व प्रा.पी.एस.खिराडे होते.
सर्व मान्यवरांनी गुरू रविदास यांच्या समतावादी, मानवतावादी व विज्ञानवादी विचारांचा अंगिकार करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सेवानिवृत्त शिक्षक उत्तमराव वाघमोडे यांनी केले.आभार अंकुश गुजरे यांनी मानले.
यावेळी ज्ञानेश्वर भानुसे, रंजित मालखेडे, गणेश वाघमारे,रविन्द्र वाघमारे, समाधान जऊळकर, वैभव ताकतोडे, गणेश भानुसे,राम कांबळे, संदीप राऊत, प्रदीप राऊत, सिद्धेश्वर खंडारे, रोहित गुजरे, अशोक विसावे, योगेश गुजरे, दत्ता गोरे, अजय गुजरे, विनायक वाघमारे, आदित्य गुजरे,,हर्षाताई मालखेडे, कावेरी भानुसे, इंदिराबाई गुजरे, प्रियांका गुजरे, अनिता गुजरे, कांताबाई गुजरे, संगिता ताकतोडे, रेखा वाघमारे, पीयूष भानुसे, गजानन भानुसे,मंगेश व शैलेश शिरभाऊ आदिंसह चर्मकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here