Home
Home सामाजिक येथे लागतो अविवाहित मुलींचा ‘बाजार’

येथे लागतो अविवाहित मुलींचा ‘बाजार’

By : Shankar Tadas

परंपरा देशोदेशीच्या..

शेकडो वर्षांची परंपरा म्हणून कित्येक वाईट प्रथा सुरू राहतात. भारतच नव्हे तर जगातील अनेक देशात अशा परंपरा दिसून येतात. महिलांच्या बाबतीत तर अन्यायकारक प्रथा आजही मोठ्या प्रमाणात आहेत. युरोपमधील एक प्रमुख देश असलेल्या बलगेरियामध्ये आपल्या अविवाहित मुलीला विकून पैसा मिळविण्याची समाजमान्य प्रथा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. 12 ते 14 वर्षांच्या मुलीही येथे विकल्या जातात. पूर्वी एकाच शहरात ही प्रथा होती. पसंत केलेल्या मुलीचा आर्थिक मोबदला देऊन तिच्याशी विवाह केला जाई. त्याकरिता मुलीची इच्छाही विचारात घेतली जात होती. आज या प्रथेला वाईट स्वरूप प्राप्त झाले आहे. आता देशातील कोणीही या मुली विकत घेतात. नंतर या मुलींना आपल्या इच्छेने सोडूनही दिले जाते. विकण्यापूर्वी मुलीची सहमती घेतली जात नाही. मात्र जुन्या प्रथेच्या नावाने येथील समाज हा अन्यायपूर्ण प्रकार खपवून घेत आहे. या देशात इसाई आणि मुस्लिम लोक प्रामुख्याने राहत असून शिक्षणाचे प्रमाणही भरपूर आहे. आता मात्र या कुप्रथेच्या विरोधात आवाज उठू लागले आहेत. परंपरेच्या नावाने महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक प्रथापैकी एक असलेला हा प्रकार सोशल मीडियामध्ये चर्चेत दिसून येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here