By : Shivaji Selokar
गडचांदूर : कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपूर विरोधात गाव सरपंच संघटना व अखिल भारतीय सरपंच संघटनाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले होते त्यावेळेस अल्ट्राटेक व्यवस्थापकाने तोडगा काढला होता त्यात काही मागण्या मान्य केले होते. आता कंपन्या दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे असे लक्षात येत आहे. मागे अनेक वर्षापासून आरोग्यसेवा देण्यात येत होती ती पण बंद करण्यात आले आहे ही बाब लक्षात घेता भारतीय जनता पार्टी नांदा फाटा द्वारे कंपनीला निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात अल्ट्राटेक कंपनी मार्फत विकास द्वारे आरोग्य सेवा दत्तक गावाना दिल्या जात होत परंतु ती सेवा आज दिल्या जात नाही आहे . दत्तक गावाना दिलेल्या सेवाना का बंद करण्यात येत आहे? या सर्व सेवा त्वरित चालू कारणात यावी व डॉक्टर, फार्मासिस्ट, नर्स नेमन्यात यावे व दत्तक गावातील आरोग्य सेवा व औषध देण्यात यावी तसेंच नांदाफाटा येथील कंपनीजवळ असलेल्या शौचालयाची दशा अशोभनीय आहे त्याची स्थिती निदनीय झालेली आहे. ती पूर्णतया बंद असून तिचा लोकांना कोणातही प्रकारच उपयोग होत नाही आणी सांड पाणी रस्ततावर येत असून त्यामुळे दुर्गदी पसरून त्यामुळे लोकांचा आरोगय प्रशन निर्माण झाला आहे. शौचालयाची आवश्यकता लक्षात घेत कंपनीने त्वरित सर्व सुविधायुक्त नवीन शौचालय उपलब्ध करून देण्यात यावा. कंपनीत ये – जा करनाऱ्या वाहनमुळे परीसरात धुळ पसरत आहे. मुख्यता कंपनी गेट पासुन मेन रोड जवळच्या सर्व परीसरात धुळ जमा होत असते . नांदा फाटा उपविभागीय पोलिस अधिकारी ते चर्च आवारपूर धुळ जमा होत असून तो धुळ सर्व दुकानांत व घरांत जात असुन त्याचा खुब नाहक त्रास सहन करावा लागत आहे . तरी त्याकरीता कंपनीने डस्त क्लिनिगं करुन सकाळ व सायंकाळच्या सुमारास पाणी मारण्यात यावे . लोडेड गाड्या मुळे चौकातील रोडला चिकनाहत आलेली आहे. तिथे दररोज दुचाकी वाहन घसरून अपघात होतात त्यामुळे बरेच लोक जखमी व त्यांन नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एखादि व्यक्ती चा जीव जाऊ शकतो. तात्काळ त्या रोड ची दुरुस्ती व आर. सी. सी संरपच संघटनेचे बेमुदत उपोषणा वेळी काही आश्वासन दिले त्यात व प्रदूषण मुक्त मशीन बसविने,दतक गावातील बेरोजगार तरुणांना अप्रेंटशिप देऊन रोजगार निर्माण करून देणे. असे अनेक समस्याचे कंपनीने देले होते . उपोषण होऊन तीन महिने लोटून नही कंपनीने कोणताही प्रकाची आश्वासन पूर्ण केली नाही . निवेदन देताना भा. जा. पार्टी चे संजय नित, हरिदास बोरकुते , सुजित ठाकूर, कैलास तांकसांडे उपस्थित होते.
**
अल्ट्राटेक द्वारे शौचालयाचे काम पुढच्या महिन्यात सुरू होणार आहे .
प्रतिक वानखेडे
व्यवस्थापक सी. एस. आर
अल्ट्राटेक आवाळपुर