कात्लाबोडी येथे भाजपा ची बुथ बैठक संपन्न

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना तालुक्यातील कात्लाबोडी येथे भाजपा तालुक्याच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना जिल्हा उपाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष होते प्रमुख पाहुणे श्री पुरुषोत्तम भोंगळे तालुका उपाध्यक्ष,दिनेश डेंगळे ,पुंडलिक पा थोरे,महेश देरकर, निलेश किसन ईखारे,सुधिर उलमले आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीत खेळीमेळीच्या वातावरणात बुथ अध्यक्ष,सचिव,बइएल 2 तसेच इतर 11 कार्यकर्त्यांची समिती गठीत करण्यात आली तसेच पेज प्रमुख निवडण्यात आले सुधीर उलमले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात केक कापून साजरा साजरा करण्यात आला तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी सुधिर उलमले यांना केक भरवुन वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा दिल्या या बैठकीला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक नवयुवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन दिनेश डेंगळे यांनी केले तर आभार गणेश इखारे यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here