Home
Home Breaking News गोरक्षनाथ प्रगट दिनानिमित्त*अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ आणि नाथमुद्रा बचतगट यांच्या संयुक्त...

गोरक्षनाथ प्रगट दिनानिमित्त*अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ आणि नाथमुद्रा बचतगट यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथे भव्य दिव्य सामूहिक विवाह सोहळा आणि नाथ दिक्षा कार्यक्रमाचे आयोजन**

 

लोकदर्शन बीड 👉 राहुल खरात

बीड- अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ बीड आणि नाथ मुद्रा बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु गोरक्षनाथ प्रकट दिनानिमित्त दि.५ मे २०२३ रोजी सालाबादप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य सामूहिक विवाह सोहळा आणि नाथ दिक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बीड जिल्ह्यातील तसेच संपूर्ण मराठवाड्यातील नाथ बांधवांना
अध्यक्ष मा.भारत नाना चव्हाण
सचिव मा. श्री हरिभाऊ भराडी
तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी आज जिल्हयातील पदाधिकारी
ह भ प भरत महाराज जोगी डॉ.पैठणकर के बी
हरिदास बामणे जयश्रीताई चव्हाण संजय सावंत सर भैरवनाथ शिंदे गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या पदाधिकाऱ्यांच्या बैठक संपन्न झाली जिल्हाध्यक्ष भरत नाना चव्हाण
के सी चव्हाण सर रंगनाथ पैठणकर दत्ता शिराळकर जगन्नाथ निकम हरिभाऊ भराडी यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वाची बैठक आज दि.१६/४/२०२३ रविवार रोजी घेण्यात आली.कार्यक्रमाचे स्वरूप भव्य असल्यामुळे निरनिराळ्या कमिट्या स्थापन करण्यात आल्या आहेत.तरी मराठवाड्यातील व प्रामुख्याने बीड जिल्ह्यातील नाथ बांधवांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here