साहेबांच्या आदेशानुसार भिमजयंतीचे उत्कृष्ट नियोजन…* *♦️वंचित बहुजन आघाडी सांगली शहर यांच्या वतीने महात्मा जोतीबा फुले व महामानव डॉ.बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न*

 

लोकदर्शन सांगली👉राहुल खरात
दि. 17 एप्रिल 2023

वंचित बहुजन आघाडी सांगली शहर अध्यक्ष मा.शिवाजी उर्फ पवण वाघमारे यांच्या कुशल नेतृत्वाखाली दि.11/04/2023 रोजी क्रांतीबा जोतीबा फुले यांच्या जयंती निमित्त कवलापूर येथील बुध्द विहारात “सावित्रीज्योती” या हे पथनाटय सादर करण्यात आले. सदर पथनाटयातून महात्मा फुले यांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग डोळयासमोर उभा करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये प्रमुख भुमिका महात्मा फुले यांच्या रुपात चळवळीतील कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडी सांगली शहराचे सदस्य विजय भाऊ लांडगे यांनी तर सावित्री माईची भूमिका श्रावस्ती विहाराच्या विद्यमान संचालिका आयु.दिपमाला कांबळे यांनी, कपट कारस्थान करणारे मनुवादी यांची भूमिका चंद्रकांत नागवंशी व पवन कदम यांनी, सावित्रीमाईना साथ देणारी फतिमा शेख यांची भूमिका आयु.चेतना नागवंशी यांनी, 1800 च्या काळातील व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या मुक्ता साळवे यांची भूमिका दिक्षा निवास पवार हिने व कार्यक्रमाचे निवेदक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे सांगली शहर अध्यक्ष पवन वाघमारे यांनी निवेदन केले. सदरचे पथनाटयाचे लेखन विजय लांडगे व पवन कदम यांनी केले. या पथनाटयाद्वारे समाजात पूर्वी माहिलांना असलेले स्थान व आताच्या माहिला व परिस्थिती या विषयावर प्रकाश टाकून पूर्वीचे शिक्षण आणि आत्ताचे शिक्षण यातील अंतर जसे सावित्री माई मुळे अनेक विद्यार्थी घडले तसे शिक्षण आज आहे का? या परिस्थीतीची जाण दाखवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी चळवळीतील मित्र सचिन कांबळे, कवलापूर विहाराचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व 70 ते 80 च्या आसपास लहान मुले, महिला, पुरुष असा जनसमुदाय उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला. तसेच यावेळी चळवळीतील कार्यकर्ते सचिन कांबळे, श्रावस्ती विहाराचे राहूल कांबळे, रुचिता पवन वाघमारे, प्रियंका सुरज कांबळे, प्रकाश शिवशरण, सिध्दार्थ पवार उपस्थित होते.
तसेच दि.12/04/2023 रोजी चिन्मय पार्क जवळील बौध्द धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहारामध्ये “सावित्रीज्योती” ती या पथनाटयाचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी जवळपास 50 ते 60 च्या आसपास जनसमुदाय उपस्थित होता. दि.13/04/2023 रोजी वंचित बहुजन आघाडी सांगली शहर व नयनतारा नर्सिंग होम यांच्या मार्फत भव्य नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले या शिबीरामध्ये 58 महिला व पुरुषांनी सहभाग नोंदवून हे शिबीर संपन्न करण्यास मदत केली. तसेच
विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.14/04/2023 रोजी बौध्द धम्म संस्कार संघ, श्रावस्ती विहार येथे वाढते उष्णता तापमान लक्षात घेऊन थंड गार मठ्ठा वंचित बहुजन आघाडी, सांगली शहर यांच्या मार्फत वाटप करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सांगली शहर अध्यक्ष पवन वाघमारे, विजय लांडगे, अरुण कांबळे, रणजित माने, राहूल कांबळे, विकास भिसे, सुरज कांबळे, नरेंद्र दांडे, अमोल कांबळे, योगेश साबळे, प्रकाश शिवशरण, अनिल शिवशरण, पवन कदम व यांच्या सहकार्याने अचुक नियोजन करण्यात आले. जयंती मोठ्या उत्साहाने आनंदात साजरी करण्यात आली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *