शिष्यवृत्ती परीक्षेत चिरनेर शाळेतील कुमारी अक्षरा जितेंद्र ठाकूर उरण तालुक्यात प्रथम.

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

 

उरण दि 6 जानेवारी
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील परशुराम धाकू खारपाटील माध्यमिक शाळा चिरनेर येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या नुकत्याच जाहीर झालेल्या पूर्व प्राथमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीच्या गुणवत्ता यादीत सन २०२२ शिष्यवृत्ती परीक्षेत कुमारी अक्षरा जितेंद्र ठाकूर या विद्यार्थीनीने घवघवीत यश संपादन करून उरण तालुक्यात प्रथम क्रमांक तर रायगड जिल्ह्यात चौथा क्रमांक पटकाविला. या यशाने चिरनेर शाळेची गुणवत्ता वाढली आहे. दरम्यान या यशाबद्दल प्राविण्य मिळविलेल्या कुमारी अक्षरा हिचे मार्गदर्शक शिक्षक रत्नाकर तुकाराम पाटील यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.दरम्यान या यशाबद्दल प्राविण्य मिळविलेल्या कुमारी अक्षरा जितेंद्र ठाकूर हिचे शाळा व्यवस्थापन समिती, पालकवर्ग आणि,शिक्षक वृंदाकडून अभिनंदन होत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *