अतिवृष्टीमुळे भिंत कोसळून 3 जण जखमी,करंजा – सातघर येथील घटना.सुदैवाने जीवितहानी नाही.

 

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे

दि. 13 सप्टेंबर उरण मध्ये पडणाऱ्या सतत मुसळधार पावसामुळे चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत करंजा सातघर येथे दि 12 रोजी रात्री 3 च्या सुमारास गाढ झोपेत असताना रहिवाशी महेंद्र पाटील यांच्या राहत्या घराची भिंत पडल्याने संगिता महेंद्र पाटील, कुणाल महेंद्र पाटील, दिपेश महेंद्र पाटील हे तीघेजण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे आई व दोन मूल यात जखमी झाले आहेत .यावेळी सुदैवाने कोणतेही जिवितहानी झाली नाही. जखमींना पूढे नवी मुंबई येथील डि.वाय पाटील हॉस्पीट येथे ऍडमिट करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

चाणजे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच अमित भगत,ग्रामविकास अधिकारी दिलीप तुरे,तलाठी तेजस चौरले आदिनी घटनास्थळी भेट देऊन जखमीची विचारपूस केली. झालेल्या नुकसानीचे पंचनामा करण्याचेही काम सुरू केले आहे.सदर नुकसान झालेल्या पाटील कुटुंबियांना त्वरित आर्थिक मदत व योग्य उपचार मिळावेत अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. उरण तालुक्यात अशा घटना वारंवार घडत असून अशा वेळी प्रशासनाने योग्य उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here