Home
Home Breaking News समाजाचा विकासात स्त्रियांचे योगदान महत्त्वाचे…. डॉ.सुनीता धर्मराव

समाजाचा विकासात स्त्रियांचे योगदान महत्त्वाचे…. डॉ.सुनीता धर्मराव

लोकदर्शन प्रतिनिधी👉 :-स्नेहा उत्तम मडावी

फोकलोर अण्ड कल्चरल हेरिटेज फाउंडेशन पुणे च्या संस्थापक अध्यक्ष डॉ.सुनीता धर्मराव यांच्याशी जेव्हा संवाद साधला तेव्हा लक्षात आले की,त्या एक उत्तम कवयित्री, लेखिका, आणि संशोधक तर आहेतचं त्याच बरोबर त्यांनी जे क्षेत्र निवडले आहे ते क्षेत्र समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.
लोकसंस्कृती जाणणे म्हणजे रुढी, परंपरा,आहार,विहार, वेशभूषा, दागदागिने,सण उत्सव,विधी, देवदेवता कुलाचार,कुलधर्म, लोकसाहित्य इत्यादीचा अभ्यास वर्तमानासाठी जेवढे आवश्यक आहे तेवढेच ते येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन डॉ.सुनीता धर्मराव गेली तीस वर्षे कार्यरत आहे.
यासर्व अभ्यासात त्यांनी लोकसंस्कृतीतील स्त्रीचा विचार अधिक केला आहे.
त्यांच्या मते,” ज्या समाजात स्त्रियांना उचित मान दिला जातो,त्यांना आत्मनिर्भर होण्यात कोणतीही अडचण नसते ..तो समाजचं प्रगतीकडे वाटचाल करतो.”
यासाठी फाउंडेशनच्या वतीने वेगवेगळ्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते.वैयक्तिक स्तरावर ही त्या समुपदेशन करतात. स्त्रीला स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी वेग वेगळे कार्यक्रम आणि उपक्रमाचे आयोजन सातत्याने करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here