Home
Home गडचांदूर / कोरपणा अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, गडचांदूर ला नागपूर विभागातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार

अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, गडचांदूर ला नागपूर विभागातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार


,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर👉 (प्रा. अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अंबुजा फाउंडेशन द्वारा संचालित ,अंबुजा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, गडचांदूर ला व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालकाकडून नागपूर विभागातील सर्वोत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आय.टी. आय.)चा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.
2018 पासून सर्वोत्कृष्ट आय टी2018 आय पुरस्कार सुरु करण्यात आला आहे, यामध्ये राज्यस्तरीय 3 व विभागस्तरीय 6 असे एकूण 9 पुरस्कार दिले जातात.
सन 2020-21 च्या पुरस्कारासाठी नागपूर विभागात कार्यरत 883 शासकीय व अशासकीय संस्थांमधून अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, गडचांदूर ची सर्वोत्कृष्ट आय टी आय म्हणून निवड झाली आहेत.
या संस्थेला मिळालेला पुरस्कार हा अत्यंत भूषणावह असून संस्थेचे प्राचार्य प्रमोद खडसे,यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई चे संचालक डी ए दळवी,सहसंचालक योगेश पाटील,उपसंचालक नितीन निकम,नागपूर विभागाचे उपसंचालक पी टी देवतळे,जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुशील बुजाडे, अंबुजा सिमेंट चे युनिट हेड कृष्ण मोहन,अंबुजा फाउंडेशन च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पर्ल तिवारी,उपाध्यक्ष कौशल्य विकास रवी नायसे,अंबुजा फाउंडेशन व्यवस्थापन समिती,व औद्योगिक प्रशिक्षण केंद्र चे सर्व प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी दिलेल्या विशेष सहकार्य बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here