देवाडा आदिवासी सहकारी संस्थेवर काँग्रेसचा झेंडा. अध्यक्षपदी चंद्रभान आडे तर उपाध्यक्षपदी शंकर

लोकदर्शन👉 मोहन भारती
राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा देवाडा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपला झेंडा फडकविला असून अध्यक्षपदी चंद्रभान आडे तर उपाध्यक्षपदी शंकर बोंकुर यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीत देवाडा आदिवासी सहकारी संस्थेचे सदस्य भीमराव कनाके, केशव कुमरे, जैतू कुलसंगे, मारोती मेश्राम, मारू वेडमे, अब्दुल जमीर, भगवान हरणधरे, राजूबाई नायनल्लू, साजनाबाई आडे, लालचंद करमनकर, सत्यपाल जाबोर, सजनाबाई जंगु आडे, भगवान नारायण हरणधरे, भिमराव भोजी कन्नाके या सर्वांनी एकमत करून अध्यक्ष, उपाध्यक्षांची अविरोध निवड केली आहे.
नवनिर्वाचीत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांचे आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे, जेष्ठ नेते हमिदभाई, पुर्णचंद्रराव रेड्डी, प्रसाद मंडवा, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी सभापती मंगेश गुरनुले, जावेद अब्दुल, भिमराव बंडी, नौष शेख, जंगू आडे, बंडू चापले, विनोद रत्नाकर, भेगेराव गेडाम, रामचंद्र जाभोर, गोपाल कुंदाराम, पर्वतराव आत्राम, हनुमंतराव चुडीवार, सुभाष कुमरे, नागन्ना चेनमेनवार, निरंजन कोरावार, सुधाकर चेनमेनवार, सतय्या पाकावार, क्रिष्णाचैतण्या बोंकुर, शिवा बोंकुर, राजाराम कुरमावार, प्रकाश तेलीवार, संभाजी जाधव, चिन्ना चेन्नुरवार, शंकर मडावी, विजय नामेवार, श्रीनू मंथनवार यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here