अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाच्या मराठवाडा युवा अध्यक्ष म्हणून डॉ.श्री शिवनाथ काशिनाथ सुरवसे यांची निवड

लोकदर्शन 👉 राहुल खरात

पाटोदा–अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ मराठवाडा “युवा अध्यक्ष पदी” बीडचे सुप्रसिद्ध डॉ. श्री शिवनाथ काशिनाथ सुरवसे यांची निवड करण्यात आली. ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयाजी के नाथ साहेब, मराठवाडा अध्यक्ष श्री सोमनाथ धायडे आणि राज्य सदस्य मा. डॉ.के.बी.पैठणकर यांनी मा. डॉ.शिवनाथ सुरवसे यांचे समाज कार्य व समाजासाठी असणारी तळमळ संघटन कौशल्य सर्वांना घेऊन पुढे जाण्याची वृत्ती आणि बीड येथे अखिल भारतीय नाथपंथी महासंघातर्फे घेण्यात आलेल्या नाथदीक्षा कार्यक्रमाचे समितीचे अध्यक्ष असल्यामुळे कार्यक्रमाचे नियोजन अतिशय उत्कृष्ट करून दाखवल्यामुळे मराठवाडा युवा अध्यक्ष म्हणून सर्वानुमते त्यांची निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीमुळे बीड जिल्हा अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाचे पदाधिकारी व संपूर्ण जिल्ह्यातील नाथ बांधव यांनी त्यांची निवड झाल्यामुळे शुभेच्छांचा वर्षाव केला असून बीड येथे हॉटेल साई प्रसाद हाँल मध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले आणि पुढील कार्याला सर्वांनी मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर सुरवसे यांनी समाजासाठी व युवा पिढीसाठी योगदान देण्याचे कबूल केले तसेच सर्वांना घेऊन अखिल भारतीय नाथपंथी समाजाची उन्नती करेल असे आश्वासन त्यांनी दिले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *