Home
Home Breaking News सन्मान “स्त्रीशक्तीच्या कृर्तृत्वाचा” पुरस्काराने सौ.मीरा धर्मवीर भारती,सौ.मालती अनिल पुरी सन्मानित

सन्मान “स्त्रीशक्तीच्या कृर्तृत्वाचा” पुरस्काराने सौ.मीरा धर्मवीर भारती,सौ.मालती अनिल पुरी सन्मानित

लोकदर्शन 👉 अनिल पुरी


⭕*महिला काँग्रेसच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान.*

राज्याचे वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.अमित विलासराव देशमुख साहेब यांच्या जन्मदिवसा निमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.त्याचाच एक भाग म्हणून महिला काँग्रेसच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा “स्त्रीशक्तीच्या कृर्तृत्वाचा”सन्मान या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या पुरस्कारा मध्ये शिक्षण,कला साहित्य.सांस्कृतिक,आरोग्य, सामाजिक,उद्योग कृषी,पञकारीता,प्रशासकीय,राजकीय,अशा विविध क्षेत्रातील कृर्तृत्वान महिलांचा समावेश होता.आपल्या कामातुन आपल्या कार्याचा वेगळा ठसा निर्माण केलेल्या महिलांचा या वेळी सन्मान कराण्यात आला या मध्ये भारती प्राँपर्टी तथा निश्चय पुरी फाउंडेशनच्या संचालिका सौ.मिरा धर्मवीर भारती व शिक्षिका सौ मालती अनिल पुरी-गिरी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here