औरंगाबाद येथील एसपीआय केंद्रत मुलींना प्रवेश दिला जावा .* *सांगली, पुणे, नागपूर, मुंबई येथे एसपीआय ची नवी केंद्रे सुरु करावीत .* *सादिक खाटीक यांची मागणी .

 

लोकदर्शन 👉 राहुल खरात

*____________________________*
आटपाडी दि १९ ( प्रतिनिधी )
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनी पुणे ( एनडीए ) साठीच्या, अद्वितीय सेवा तयारी संस्था औरंगाबाद ( एस पी आय ) येथे मुलींना प्रवेश देण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला जावा तसेच औरंगाबाद प्रमाणेच नागपूर , मुंबई, पुणे, सांगली या आणखी ४ ठिकाणी अद्वितीय सेवा तयारी संस्थेची केंद्रे ( एस .पी आय ) निर्माण करावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी केली आहे .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना पाठविलेल्या ई – मेल द्वारे केली आहे .
भारतीय संरक्षण दलाच्या पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची ( एन .डी . ए . ) आणि लष्कराची दारे पुरुषांप्रमाणे महिलांनाही खुली करण्याचे आदेश सर्वोच्य न्यायालयाने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भारतीय लष्कराला दिले आहेत. त्यानुसार भारतीय लष्कराने यंदा आपल्या धोरणात सुधारणा करून मुलांच्या प्रमाणे मुलींनाही एनडीए मध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे . लष्करात अधिकारी बनण्यात मराठी टक्का वाढावा म्हणून लेप्टनंट जनरल एस . पी . पी . थोरात यांच्या अध्यक्षते खाली समिती स्थापन करून त्या समितीच्या शिफारशीनुसार १९७७ सालापासून महाराष्ट्र सरकारने अद्वितीय सेवा तयारी संस्था ( एसपीआय ) औरंगाबाद येथे स्थापन केली . महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग डेस्क २८ यांच्यामार्फत या संस्थेचे काम चालते . आणि त्यातून प्रत्येक वर्षी मराठी मुले मोठ्या प्रमाणावर अधिकारी होण्यासाठी एनडीए मध्ये सामील होत आहेत . औरंगाबाद एसपीआय अशी कामगिरी करत असताना आज ही येथे मुलींना प्रवेश नाही . गेल्यावर्षी पासून एनडीए मुलींचे अर्ज स्विकारू लागले आहे . आता महाराष्ट्र शासनाने आपल्या संस्थान मध्ये ( एसपीआय एनडीए औरंगाबाद ) जशी मुलांची ( इंटेक सीटस् – ६० ) तयारी करते . तितक्याच प्रमाणात मुलींच्या ही ६० सीटस् वाढविण्यात याव्यात . अशी मागणी करून सादिक खाटीक यांनी , महाराष्ट्राने नेहमीच स्त्री शिक्षणाच्या बाबतीत क्रांतीकारी पाऊल टाकले आहे.संरक्षणमंत्री असताना श्री . शरद पवार साहेबांनी महिला वैमानिकांना मिग विमान हाताळण्याचे आदेश दिले होते . तो एक क्रांतीकारी निर्णय ठरला . आता ही , महाराष्ट्रातील मुली हुशार आहेत हे लक्षात घेऊन आपण या मुलींना लष्करात अधिकारी बनण्यासाठी स्पाय एसपीआय औरंगाबाद येथे स्वतंत्र व्यवस्था करावी आणि ६० विद्यार्थीनीसाठी आवश्यक असणारी आर्थिक तरतुद आस्थापना आदी साठी तातडीने विशेष बाब म्हणून मंजुरी द्यावी . या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारचा देशात नावलौकीक होणार आहे . त्यामुळे हा क्रांतिकारी निर्णय घेऊन त्याची मोठी प्रसिद्धी करण्यात यावी . तसेच महाराष्ट्र शासनाच्या मार्फत १९७७ नंतर औरंगाबाद सारखी दुसरी संस्था उभी राहीलेली नाही . आज देशभरातून ६ लाखाच्या आसपास विद्यार्थी, एनडीए च्या ४०० जागांसाठी अर्ज करत असतात . त्यामुळे देशभरात याविषयीची स्पर्धा किती आहे हे माहिती होते . गेल्या वर्षी एसपीआय औरंगाबाद येथे ट्रेनिंग दिलेल्या ६० पैकी २२ मुले एनडीए त प्रवेश मिळवू शकली . याचा अर्थ आपल्या प्रशिक्षणाचा दर्जा उच्च आहे . मात्र वाढती संख्या लक्षात घेता अशी किमान आणखी ४ केंद्रे राज्य शासनाने राज्यात सुरु करण्याची आवश्यकता आहे . एनडीए पुणे येथे असल्याने पुण्या बरोबरच नागपूर, मुंबई, सांगली येथे औरंगाबाद सारखी अशी केंद्रे सुरु केली तर मराठी मुलां मुलींचा उत्साह वाढीस लागेल . औरंगाबाद व अन्य ४ ठिकाणच्या मागणी केल्या जात असणाऱ्या नव्या संस्था – केंद्रावर मुलांप्रमाणे मुलींनाही तितक्याच जागा उपलब्ध केल्या जाव्यात, याबाबत आपण आपल्या पातळीवर योग्य तो निर्णय घ्यावा. असे ही सादिक खाटीक यांनी या ई – मेल मध्ये म्हटले आहे .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *