खासदार बाळू धानोरकर यांची नितिन भटारकर यांच्या उपोषण मंडपाला भेट*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

*⭕दोन दिवसाअगोदर घेतली होती अधिका-यांसोबत आढावा बैठक*

⭕*शासनदरबारी लावणार रेटा*

चंद्रपूर :-
दुर्गापुर, ऊर्जानगर व लगतच्या परिसरात मागील अनेक महिन्यांपासून वाघ, बिबट्या व अस्वल यांचा मानवी वस्तीत मोठ्या प्रमाणात वावर वाढलेला होता.
मागील काही महिन्यात झालेल्या या प्राण्याच्या हल्ल्यात या परिसरातील जवळपास ७ ते ८ सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. म्हणून या हिंस्त्र प्राण्यांना जेरबंद करण्यात यावे याकरिता वन विभाग चंद्रपूर यांच्याकडे वारंवार प्रत्यक्ष भेटून निवेदने देऊन मागणी करण्यात आली होती, परंतु वनविभागातर्फे कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाही.
दिनांक १६ व १७ फेब्रुवारी २०२२ या सलग दोन दिवशी या परिसरातील २ नागरिकांचा या प्राण्याच्या हल्ल्यात जीव गेला व यासाठी यूवक राष्ट्रवादी कांग्रेसचे नितिन भटारकर हे उपोषणाला बसले आहे. या उपोषणमंडपाळा भेट देत नितिन भटारकर यांचेशी खासदार धानोरकर यांनी चर्चा केली. व या गंभीर विषया संदर्भात बैठक घेवून शासनदरबारी रेटा लावू असे आश्वासन दिले.
दोन दिवसाअगोदर संबधीत अधिका-यांसोबत आढावा बैठक घेतली होती. परिसरातील वाघांना जेरबंद करण्यासंदर्भात ज्या काही उपाययोजना आहे तात्काळ राबविणे संदर्भात पाऊल उचलल्या जाइल यासाठी प्रशासन व शासनासौबत चर्चा करु, असे सांगण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिरे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, दुर्गापूर ऊर्जानगर संघर्ष समितीचे मुख्य संयोजक बाळुभाऊ चांदेकर, शिवसेना नेते शालीक फाले, मुन्ना जी आवळे, सचिन जी मांदळे,देविदास जी रामटेके, ग्रामपंचायत सदस्य आवळे ताई, राष्ट्रवादी कामगार सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संजय शेजुळ, रोशन जी फुलझेले संतोष जी नरुले, राजूभाऊ डोमकावळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here