छत्रपती शिवाजी महाराज यांना पालकमंत्री डॉ. राऊत यांनी केले अभिवादन

By 👉 Shankar ,Tadas

नागपूर, १९ फेब्रुवारी २०२२ :- नागपूरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठय़ा उत्साहात सर्वत्र साजरी करण्यात आली. याप्रसंगी राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी बेझनबाग येथील जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी डॉ. राऊत यांनी नागरिकांना शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. प्रसंगी घोषणाही देण्यात आल्या.

यावेळी कृष्णकुमार पांडे, बंडोपंत टेभूर्णे, रत्नाकर जयपुरकर, सुरेश पाटील, दिपक खोब्रागडे, मुलचंद मेहर, नगरसेवक आणि मोठ्यासंख्येने पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here