राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलच्या मुलाच्या लग्नात सलमान खानचा शिल्पा शेट्टी सोबतचा धमाल डान्स।व्हारल।

लोकदर्शन। 👉 मोहन भारती।.

 

जयपूर। ÷ राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्याच्या मुलाच्या लग्नात सलमान खानचा धमाल डान्स, शिल्पा शेट्टीसोबत नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल
या लग्नसभारंभात नाचताना एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बॉलिवूडचा बजरंगी भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. कोणतीही भूमिका असो सलमान त्याला पूर्णपणे न्याय देतो. सलमानचे जगभरात लाखो चाहते आहेत . तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. नुकतंच सलमानने माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्या मुलाच्या लग्नात हजेरी लावली. या लग्नसभारंभात नाचताना एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांचा मुलगा प्रजय यांचा विवाहसोहळा नुकतंच पार पडला. या लग्नानिमित्त जयपूरमधील रामबाग पॅलेसमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला उद्योगपती अनिल अंबानी, गौतम अदानी यांच्यासह इतर उद्योगपतींनी हजेरी लावली. त्यासोबतच बॉलिवूड अभिनेता सलमान खान, शिल्पा शेट्टी यांसह चित्रपट क्षेत्रातील अनेक अभिनेते आणि राजकीय नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रुफल पटेल हे सलमान खान, शिल्पा शेट्टीसोबत डान्स करताना पाहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here