सावित्रीबाई फुले विद्यालयात बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

लोकदर्शन ÷
गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 ‌वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला आदरांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.प्रमोद वांढरे,प्रा.प्रशांत खैरे,प्रा.जहिर, ज्योति चटप उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक काळे तथा प्रमुख अतिथिंनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अध्यक्ष तथा प्रमुख अतिथिंनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांची प्रेरणा आणि आदर्श समोर ठेवून जीवनात प्रगती करण्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा संचालक महेंद्र कुमार ताकसांडे यांनी तर आभार प्रा. प्रविण डफाडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here