सार्वजनिक रस्त्यावर कचरा फेकल्याप्रकरणी पाच हजाराचा दंड घनकचरा व्यवस्थापन अधिनियमाचे उल्लंघन.           

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर।


चंद्रपूर, ता. ३ : सार्वजनिक रस्त्यावर घनकचरा फेकल्या प्रकरणी व घनकचरा व्यवस्थापन अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई महेश भवन येथे मारुती कॅटर्स यांच्या विरोधात करण्यात आली. यापुढे सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकू नये, अशी तंबीही महानगर पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या पथकाने दिली आहे.

शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून चंद्रपूर शहर स्वच्छ राखण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकण्यात येऊ नये यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्याउपरही उघड्यावर कचरा टाकला जातो. घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ नुसार शहरातील मोठ्या प्रमाणावर कचरा उत्पन्न करणाऱ्या आस्थापनांनी ओल्या आणि सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. मात्र, महेश भवन येथील मारोती कॅटर्सच्या व्यवस्थापकाने सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकल्याचे निदर्शनास आले. घनकचरा व्यवस्थापन अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनपाच्या स्वच्छता विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here