Home
Home चंद्रपूर माणिकगड सिमेंट कंपनी येथील सुरक्षा रक्षक कामगार सेनेला शिवसेनेच्या पाठबळामुळे यश

माणिकगड सिमेंट कंपनी येथील सुरक्षा रक्षक कामगार सेनेला शिवसेनेच्या पाठबळामुळे यश

By : Manoj Gore
चंद्रपूर :
चंद्रपूर येथील केंद्रीय कामगार श्रम आयुक्त कार्यालय येथे केंद्रीय सहाय्यक कामगार आयुक्त श्री प्रशांत सिंघ यांच्या उपस्थितीत, तसेच आय.एस सेक्युरिटी फोर्स चे पदाधिकारी राकेश सिंग यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख श्री बंडूभाऊ हजारे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी शिवसेना कोरपणा तालुका प्रमुख राकेश जी राठोड गडचांदूर शहर प्रमुख विकी भाऊ राठोड हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीत माणिकगड सुरक्षा रक्षक यांचा 12 तासावरून 08 आठ तास तासिका वेळ ठरवण्यात आली व यावर सहाय्यक कामगार आयुक्त यांची मंजुरी घेण्यात आली . या अगोदर सुरक्षा रक्षकांना बारा तास तासिका शिफ्ट असायची आता आठ तासाची शिफ्ट करण्यात आली असल्याने सर्व कामगारा मध्ये उत्साहाचा वातावरण निर्माण झाली आहे .
शिवसेना हा पक्ष कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी झटणारा पक्ष असून अन्याय अत्याचाराविरोधात लढणारा पक्ष आहे असे प्रतिपादन शिवसेना चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख श्री बंडूभाऊ हजारे यांनी व्यक्त केली. येणाऱ्या समोर काळातही शिवसेना शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी झटणार असल्याचे हजारे साहेबांनी मनोगत व्यक्त केले. हा विजय कामगारांचा आणि शिवसेनेचा असून यासाठी अहोरात्र झटणार असल्याचे सर्वानुमते ठरले.
या बैठकीमध्ये सुरक्षा रक्षकांचे विविध समस्येचे निराकरण करण्याच्या हेतूने व माणिकगड सिमेंट कंपनी यांच्या होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध लढा देण्यासाठी व सुरक्षारक्षक व कामगारांना न्याय, मूळ वेतन, व्हेज बोर्ड नुसार तासिका वेळ मिळवून देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत कोरपना तालुक्याचे तालुकाप्रमुख राकेश राठोड, उपतालुकाप्रमुख आशिष भाऊ नामेवाड, गडचांदूर शहर प्रमुख विक्की राठोड, अरविंद गोरे, मोरेश्वर नक्षीने, राजू भाऊ बघेल, सुयोग अवताडे, सुरेश खापर्डे, मनोज खांडेकर इत्यादी शिवसेनेचे पदाधिकारी व सुरक्षा रक्षक परमेश्वर पिदुरकर, ईश्वर विदुरकर, बाळू राठोड, मोहन जाधव, विवेक नगराडे, नंदलालजी चौधरी, प्रवीण राठोड, संतोष रुईवाडे, मिलिंद सुखदेवी, संतोष महुर्ले, अंकुश सांगोळे, निलेश चिंचोलकर, अनिल चव्हाण, महिंद्रा आत्राम, प्रवीण चंदेलवार, मिथुन निमगडे आदी बहुसंख्येने सुरक्षा रक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here