जिवती येथे लवकरच अग्निशामक यंत्रणा उभी करणार. आमदार सुभाष धोटे.

By : Mohan Bharti

राजुरा  :– जिवती तालुका युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज दि.03 नोव्हेंबर 2021 रोजी आमदार सुभाष धोटे यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन जिवती तालुक्यातील सतत घटित होणाऱ्या आगीच्या दुर्घटना व त्यावर उपाय करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. जिवती आणि परिसरात घरांना आग लागून नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यातही रात्रीच्या सुमारास या घटना होत असल्याने मोठे नुकसान होत आहे, आग आटोक्यात आणण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध नसल्याने आग नियंत्रणात आणण्यात खूप वेळ लागतो. तोपर्यंत घरांचे, घरातील सर्व महत्त्वाच्या साहित्यांचे, जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान होते. त्यामुळे येथे अग्निशामक यंत्रणा उभारण्यात यावी अशी मागणी या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. यावर आमदार सुभाष धोटे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिवती येथे लवकरच अग्निशामक यंत्रणा सज्ज करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी या शिष्टमंडळात जिवती येथील युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव सिताराम मडावी, जिवती तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष कंटू कोटनाके , अशपाक शेख माजी उपनगराध्यक्ष तथा महासचिव जिल्हा युवक काँग्रेस, सुग्रीव गोतावळे माजी उपसभापती, सत्तरशाहजी कोटनाके,विष्णू रेड्डी अध्यक्ष ओबीसी विभाग, सुनिल शेळके ,विलास वाघमारे,, ,यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here