अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला चंद्रपूर जिल्ह्यातून पत्रकार रवाना

by : Shankar Tadas 

चंद्रपूर : जिल्ह्यातून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जळगाव जामोद येथील राज्यस्तरीय खुले पत्रकार संघाच्या अधिवेशनाकरिता जिल्ह्यातील पत्रकार आज रवाना झाले. यावेळी चंद्रपूरचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी शुभेच्छा दिल्या व पत्रकारांशी संवाद साधला.

अधिवेशनाचे उदघाटक आमदार व माजी मंत्री डॉ.संजय कुटे तर अध्यक्षस्थानी भारत सरकार केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव राहणार आहेत. यावेळी विद्यमान आमदार ऍड. आकाश फुंडकर, दै .लोकमत सहयोगी संपादक मुंबई, ज्येष्ठ पत्रकार तथा अधिसिवकृती समिती अध्यक्ष यदु जोशी मंत्रालय मुंबई यांची यावेळी उपस्थिती असेल. आय. एन. एस .समितीचे कार्यकारी सदस्य विलासराव मराठे, ज्येष्ठ संपादक जयराम आहुजा, काँग्रेसच्या प्रदेश सचिव डॉ.स्वाती वाकेकर, राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष प्रसन्नजीत पाटील, शाहू परिवाराचे अँड संदीप शेळके, ज्येष्ठ संपादक श्रीकृष्ण चांडक, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे, रवींद्र लोखंडे, सुरेंद्रकुमार आकोडे, गोपाल हरणे ज्येष्ठ पत्रकार यावेळी उपस्थिती राहणार आहे. या अधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्यातून विविध क्षेत्रातून असंख्य पत्रकारांनी सहभाग दर्शविला असून ३ जानेवारी २०२४ ला सकाळी १० वाजता महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक यांच्या मार्गदर्शनात शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथून जळगाव जामोद येथे राज्यस्तरीय अधिवेशनाला रवाना होण्याकरता निघालेल्या ट्रॅव्हल्स गाडीला चंद्रपूर चे लोकप्रिय विद्यमान आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी सामाजिक भान राखत इलेक्ट्रॉनिक्स प्रिंट वाहिनी माध्यमातून काम करणाऱ्या ग्रामीण शहरी व जिल्हा सहभागी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.   अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक , चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष किशोर पत्तीवार, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पारखी, सुरज गोरंतवार जिल्हा मार्गदर्शक, धर्मेंद्र शेरकुरे गणेश नालमवार तालुका प्रसिद्ध प्रमुख, मनोज गाठले तालुका उपाध्यक्ष वरोरा, मोरेश्वर उघोजवार सावली अध्यक्ष, खोमदेव तुम्हेवार सावली, लोकदर्शन पोर्टलचे संपादक शंकर तडस कोरपणा, जगदीश पेंदाम वरोरा, हबीब शेख तालुकाध्यक्ष कोरपणा, निखिल धोंडरे, समीर आसुटकर, विनोद शर्मा, बबन गोरंतवार आदींचा सहभाग आहे.  चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण ६५पत्रकार विविध माध्यमाने रवाना होत आहे. चंद्रपूर येथून रवाना होणाऱ्या सर्व क्षेत्रातील पत्रकार बांधवांना आवर्जून शुभेच्छा देण्याकरता इलेक्ट्रॉनिक्स वाहिनी ,प्रिंट छायाचित्र माध्यमातील प्रतिनिधी देवानंद साखरकर, श्याम हेडाऊ, गौरव पराते, धनंजय साखरकर, सुनील बोकडे आधी इतर सर्व समावेशक पत्रकार संघातील प्रतिनिधींनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *