चंद्रपूरातील बाबुपेठ प्रभागासह नगीनाबाग, वडगांव व लालपेठ कॉलरी प्रभागातील विकासकामांसाठी १८.७४ कोटी रू. निधीच्‍या विकासकामांना मान्‍यता.

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

⭕*आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अथक परिश्रमांचे फलीत.*

*⭕विकासाच्या मार्गावर दमदार वाटचाल*

विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर शहरातील बाबुपेठ प्रभागासह नगीनाबाग आणि वडगांव या प्रभागातील विकासकामांसाठी १८.७४ कोटी रू. निधी मंजूर करण्‍यात आला आहे. नगर विकास विभागाच्‍या दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ रोजीच्‍या शासन निर्णयान्‍वये सदर विकासकामांना मान्‍यता देण्‍यात आली आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात सदर विकासकामांसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. दिनांक ८ मार्च २०१९ च्‍या शासन निर्णयान्‍वये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांकरिता रू. ६७ कोटी निधी मंजूर करण्‍यता आला होता. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पाठपुराव्‍याच्‍या अनुषंगाने जिल्‍हाधिकारी चंद्रपूर यांनी दिनांक १८ जानेवारी २०२२ रोजी शासनाला प्रस्‍ताव सादर केला. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांच्‍या फलस्‍वरूप रू. १८.७४ कोटी रू. किंमतीच्‍या विकासकामांना २८ फेब्रुवारी २०२२ च्‍या शासन निर्णयानुसार मान्‍यता देण्‍यात आली आहे.

प्रामुख्‍याने बाबुपेठ प्रभाग क्र. १३ व हिंदुस्‍थान लालपेठ कॉलरी प्रभाग क्र. १६ येथे म. फुले चौक ते जुनोना चौकापर्यंतच्‍या बी.टी. रस्‍त्‍याचे तसेच भूमीगत नाल्‍यांचे बांधकाम करणे, बाबुपेठ प्रभाग क्र. १३ मधील आंबेडकर चौक ते बाबुपेठ उडडाणपुल ते श्री. रामटेके यांच्‍या घरापर्यंत बी.टी. रस्‍त्‍याचे तसेच भूमीगत नालीचे बांधकाम, लालपेठ प्रभाग क्र. १६ येथे कामगार चौक ते कॅन्‍टींग चौकपर्यंतच्‍या बी.टी. रस्‍त्‍याचे तसेच भूमीगत नालीचे बांधकाम करणे, हिंदुस्‍थान लालपेठ कॉलरी प्रभाग क्र. १६ येथे पुलिस चौकी ते श्री. सोनटक्‍के यांच्‍या घरापर्यंत सिमेंटकॉंक्रीट रस्‍त्‍याचे बांधकाम करणे, बाबुपेठ प्रभाग क्र. १३ येथे श्री. कोटनाके यांच्‍या घरापासून श्री. अन्‍नाजी कोले, श्री. पंडीत, श्री. साळवे यांच्‍या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्‍त्‍याचे तसेच भूमीगत नालीचे बांधकाम करणे, नगीनाबाग प्रभाग क्र. ९ येथे श्री. राकेश कुरेकार यांच्‍या गॅरेजपासून महसुल कॉलनी पर्यंत बी.टी. रस्‍त्‍याचे नुतनीकरण करणे, नगीनाबाग प्रभाग क्र. ९ येथील महसुल कॉलनीमध्‍ये सिमेंट कॉंक्रीट रस्‍त्‍याचे बांधकाम करणे, वडगांव प्रभाग क्र. ८ येथे बापटनगर (लक्ष्‍मीनगर) येथील खुल्‍या जागेसाठी संरक्षक भिंत बांधकाम व खुल्‍या जागेचे सौंदर्यीकरण करणे या विकासकामांसाठी १८.७४ कोटी रू. निधीला मान्‍यता देण्‍यात आली आहे.

यापूर्वीही आ. मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने प्रामुख्‍याने बाबुपेठ प्रभागात बाबुपेठ उडडाणपुलासाठी निधी, भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी स्‍टेडियम, भारतरत्‍न डॉ एपीजे अब्‍दुल कलाम निसर्ग उद्यान आदी प्रमुख कामांसह विविध रस्‍त्‍यांच्‍या बांधकामांसाठी निधी उपलब्‍ध करण्‍यात आलेला आहे. नुकताच या परिसरातील शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयातील मुलींच्‍या वसतीगृहासाठी ७ कोटी ८९ लक्ष ६० हजार रू. इतका निधी मंजूर करण्‍यात आलेला आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पालकमंत्री पदाच्‍या कार्यकाळात चंद्रपूर शहरात विकासकामांची दिर्घ मालिका तयार करण्‍यात आली आहे. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्‍कृतीक सभागृहाचे आधुनिकीकरण व नुतनीकरण, कै. बाबा आमटे अभ्‍यासिकेचे बांधकाम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, दाताळा पुलाचे बांधकाम, वन अकादमी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र ,टाटा कॅन्‍सर हॉस्‍पीटलचे बांधकाम, सैनिकी शाळा , बाबुपेठ प्रभागात शांतीधाम विकसित करणे, पत्रकार भवन , बाबुराव शेडमाके स्‍टेडियमच्या बांधकामासाठी निधी मंजूर , ज्युबिली हायस्कूल च्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर , महाकाली मंदिर परिसराच्या विकासासाठी 60 कोटी रु निधी मंजूर, जिल्‍हा स्‍टेडियमचा पुनर्विकास, शिवाजी चौकचे सौंदर्यीकरण, हुतात्‍मा स्‍मारकाचे बांधकाम, टाटा कॅन्‍सर हॉस्‍पीटलचे निर्माण, नियोजन भवनाचे बांधकाम, पोलिस विभागासाठी अत्‍याधुनिक जीमचे बांधकाम व पोलिस वसाहतीचे बांधकाम आदी विकासकामे मंजूर करण्‍यात आली आहे.

अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात ज्‍या विकासकामांसाठी निधी मंजूर करण्‍यात आला होता ती कामे सुरू करणे व पुर्णत्‍वास आणणे याकडे विशेष लक्ष देत आ. मुनगंटीवार यांनी विकासाच्‍या मार्गावर दमदार वाटचाल सुरू केली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *