अफरोज शेख नेपाळमध्ये फुटबॉल खेळणार ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर 👉.प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम, बिबी येथील अफरोज रहीम शेख या तरुणाची नेपाळमधील पोखारा येथे होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल आवारपूरचा तो इयत्ता बारावीचा विद्यार्थी आहे. युवा फुटबॉल स्पोर्टिंग असोसिएशन, वणी या संघाकडून तो खेळणार असून नेपाळला जाण्यासाठी आज (दि. २८ ला) रवाना झाला आहे. हैद्राबाद येथे झालेल्या फुटबॉल स्पर्धेत त्याने आपल्या खेळाची चुणूक दाखवली होती. विदेशात खेळण्यासाठी त्याच्या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *